बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे खोटी फिर्याद देणारी महीला यांना न्यायालयाकडून ५००० रूपये दंड... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 20, 2023

बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे खोटी फिर्याद देणारी महीला यांना न्यायालयाकडून ५००० रूपये दंड...

बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे खोटी फिर्याद देणारी महीला यांना न्यायालयाकडून ५००० रूपये दंड...
बारामती:-दि. १२/०८/२०२३ रोजी फिर्यादी अ ब क यांनी त्यांना आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून लैगिंक अत्याचार केलेबाबत व दि. २४/०८/२०२३ रोजी फिर्यादी यांना आरोपीने मारहाण करून लैगिंक अत्याचार केलेबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील फिर्यादी यांनी दिलेली फिर्याद हया महीलांसंबंधीत गंभीर अपराधाच्या असल्याने यातील आरोपींना पोलीसांनी तात्काळ अटक
केली होती.दोन्ही गुन्हयातील आरोपीत यांनी मा. अति सत्र न्यायालयात बारामती येथे जामीन अर्ज दाखल केले असता यातील फिर्यादी यांनी मा न्यायालयात प्रतिज्ञापत्राव्दारे रागाच्या भरात गैरसमजुतीने तक्रार दिलेबाबत कळविले. यातील
तपासी अधिकारी यांनी दाखल केलेले म्हणणे तपासाची कागदपत्रे व फिर्यादी यांचे लेखी प्रतिज्ञापत्रावरून मा अति. सत्र न्यायाधीश बारामती यांनी दोन्ही फिर्यादी यांना त्यांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला म्हणून ५००० रूपये दंड पोलीस कल्याण निधी मध्ये जमा करण्याचा आदेश दिला आहे. वर नमुद दोन्ही गुन्हयांचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे, मा पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि श्री राहुल घुगे
यांनी केला आहे. सदर जामीन अर्ज सुनावणीवेळी सरकारी वकील म्हणून श्री ज्ञानदेव शिंगाडे व कोर्ट अंमलदार म्हणून पो हवा अभिमन्यू कवडे यांनी काम पाहीले आहे.

No comments:

Post a Comment