बारामती:- बारामती शहरातील गणेश विसर्जन सोहळा २०२३ कामे शासनाने पर्यावरण पूरक व प्रदूषण मुक्त गणेश उत्सर्जन करणे बाबत सूचना दिल्या आहेत, त्यानुसार आज दिनांक २५/ ०९/२०२३ ते ३०/०९/२०२३ या कालावधीत गणेश विसर्जनासाठी गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येत आहेत शहरातील जि.प.प्राथमिक शाळा तांदुळवाडी ,चिंचकर शाळा तांदूळवाडी, जि.प. परिषद शाळा शिवाजीनगर, कवि मोरोपंत शाळा श्रीरामनगर, रुई क्षे. कार्यालय समोर, अभिमन्यू कॉर्नर बनकर वडेवाले जवळ, सूर्यनगरी मंडई शेजारी, जळोची क्षेत्रीय कार्यालय जि. प. प्राथ. शाळा, माळवरची देवी मंदिरालगत ठिकाण १, माळावरची देवी मंदिरालगत ठिकाण २, गणेश मंदिर समोर सायली हिल, बारामती सहकारी बँक शेजारी सम्यक, जेष्ठ नागरिक संघ कार्यालय कॅनॉल शेजारी, वीर गोगादेव मंदिराजवळ, रिंग रोड कॅनॉल पुलाजवळ, मोरगाव रोड ढवाण शाळा, खरेदी विक्री पेट्रोल पंप शेजारी खंडोबानगर, जि.प.प्राथमिक शाळा शारदानगर,बालकल्याण केंद्र प्राथमिक शाळा मुक्ती टाऊनशिप फेज २, धो. आ.सातव शाळा जगताप मळा, शाहू हायस्कूल पाटस रोड, ख्रिश्चन कॉलनी कॅनल लगत, तीन हत्ती चौक, तुपे बंगला समोर, अशोक नगर पंचायत समिती समोर भारत बेकरी, परकाळे बंगला, दशक्रिया विधी घाट कसबा,माता रमाई भवन, अशा २९ ठिकाणी बारामती नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम जलकुंडांची उभारणी करण्यात येणार आहेत.
बारामती शहर परिसरात पर्यावरणपूरक गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंड उभारण्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या गणेश विसर्जनासाठी नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली असून. गेली अनेक वर्षे पर्यावरणपूरक विसर्जनाचा आदर्श देणारे गणेशभक्त यंदाही पर्यावरणपूरक विसर्जनावर भर देणार आहेत. दि २८ सप्टेंबर रोजी घरगुती गणपती विसर्जन असून, त्यासाठी बारामती नगर परिषदेने जय्यत तयारी केली आहे. बारामती शहरात २९ ठिकाणी कृत्रिम जल कुंडांची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. १० दिवसांपासून विराजमान झालेल्या घरगुती गणरायाला निरोप देण्यासाठी बारामती नगरी सज्ज झाली आहे. यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास शहरात २९ ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात येत असून.यावेळी निर्माल्य संकलनाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.यंदा लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायांमुळे सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. आता घरगुती गणरायाला (दि.२८ सप्टेंबर) रोजी निरोप देण्याचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाकडून पर्यावरणपूरक विसर्जनाची पूर्वतयारी करण्यात आली आहे.
रात्री आवश्यक तिथे विद्युत दिव्यांची व्यवस्था केली आहे. तसेच संकलित झालेल्या श्री गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी ८ मोठी वाहने व निर्माल्य संकलनासाठी २० वाहने यांची व्यवस्था असणार आहे. तसेच बानपाचे १० अधिकारी विसर्जन सोहळ्यात पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत, दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक, विसर्जन प्रक्रियेसाठी सुमारे १५० हून अधिक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ तसेच सायं ५ ते विसर्जन संपेपर्यंत अशा दोन शिफ्टमध्ये हे कर्मचारी काम करणार आहेत. याशिवाय त्यांच्या मदतीला विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, कार्यकर्ते गणेशभक्त असणार आहेत.पर्यावरण पूरक गणेश विसर्जन सोहळा साजरा करण्यासाठी बारामती नगर परिषद सज्ज झाली असून सर्व घरगुती गणेश भक्त सार्वजनिक गणेश मंडळे आपण कृत्रिम जलकुंडा मध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करावे आणि पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा अशी आग्रहाची विनंती करण्यात येते.
No comments:
Post a Comment