बारामती:- नागरिकांनी केलेल्या वृत्ताची बारामती तालुका पोलीसांनी व निर्भया पथक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती यांनी संयुक्त कारावाई करित कॅफे ग्राउंड अप विदया कॉर्नर बारामती येथील सदर कॅफेची
अचानक तपासणी केली असता कॅफेमधील पडदे लावुन पार्टीशन केलेल्या जागेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुले मुली एकांतात बसुन असभ्य वर्तन व अश्लिल चाळे करत असलेचे आढळुन आले. या प्रकरणी कॅफे ग्राउंड अप विदया कॉर्नर एमआयडीसी बारामती चे मालक सुहास तानाजी कदम व मॅनेजर मयुर बाळु कदम यांचेवरती गुन्हा दाखल केलेला आहे. अशी माहिती मा. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी
दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, बारामतीमधील एमआयडीसी परिसरामधील विदयाप्रतिष्ठान शाळेच्या परिसरामध्ये बरेच कॅफे सुरू करण्यात आली असुन या कॅफेत महाविदयालयीन मुला मुलींना निवांतपणे गप्पा मारता येतील असा व्यावसायिक दृष्टीकोने ठेवुन व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे कॅफेत जाण्याकडे तरूण तरूणीचा कल वाढला असुन कॅफे व्यवसाय तेजीत आला आहे. त्यामुळे संबधीत कॅफे चालकावरती कारवाई व्हावी अशी नागरिकामधुन चर्चा होत होती. याबाबत पोलीस निरीक्षक मोरे यांनी सांगितले की, पालकांनी सुद्धा याबाबतीत गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे असुन संबंधित सर्व कॅफे चालकाना नोटिसा बजावण्यात आल्या असुन त्यांनी कॅफेमधील पार्टिशन काढुन नाही टाकले तर त्याचेवरती कठोर कारवाई करण्यात येईल व सदर कॅफेचालकाचे परवाने रदद करण्याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकारी बारामती (प्रांत) यांना पाठविण्यात येणार आहे.सदरची कारवाई मा. आनंद भोईटे सर, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग व श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग बारामती याचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती, व बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी संयुक्त रित्या पार पाडली.
No comments:
Post a Comment