बापरे..गणपती बसविण्यासाठी विना
परवानगी वर्गणी गोळा केल्यास होऊ शकते मंडळावर कायेदिशीर कारवाई..
औरंगाबाद:-महाराष्ट्रात सर्वत्र गणपती मंडळाची लगबग पाहायला मिळत असून, अनेक मंडळांकडून बाप्पाच्या आगमनाची तयारी
करण्यात येत आहे. दरम्यान, अनेकदा सार्वजनिकरीत्या गणपती बसवला जातो.
यासाठी परिसरातील किंवा सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांकडून वर्गणी जमा करण्यात येते. मात्र,सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी लोकांकडून वर्गणी गोळा करण्याआधी धर्मादाय आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय या कार्यालयाकडून रितसर पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. अशी परवानगी न घेता
वर्गणी गोळा केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते अशी माहिती धर्मादाय सहआयुक्त यांनी दिली आहे.औरंगाबादच्या धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम 1950 मधील कलम 41 क अन्वये विविध जयंती सण जयंती जसे गणेशोत्सव,नवरात्रोत्सव,
दहीहंडी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वगैरे या करीता वर्गणी गोळा करण्यासाठी या कार्यालयाततून परवानगी देण्यात येत असते. सध्या गणेशोत्सव जवळ येत असल्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध गणेश मंडळे लोकांकडून उत्सवासाठी देणगी गोळी करीत असतात.
अशी देणगी गोळा करण्यासाठी धर्मादाय सह आयुक्त या कार्यालयातून परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. अशी परवानगी न घेता देणगी गोळा करणाऱ्या गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुमच्या
मंडळाकडून असे वर्गणी केली जाणार असेल तर अधिकृत परवानगी काढून घ्यावी असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
कशी मिळणार परवानगी? देणगी गोळा करण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी
सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम 1950 मधील कलम 41 क अन्वये धर्मदाय आयुक्त कार्यालयातून परवानगी घ्यावी. अशाप्रकारची परवानगी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात येते. ऑनलाईन पद्धतीने अर्ज
सादर करण्यासाठी charity.maharashtra.gov.in
संकेतस्थळावर event registration यामध्ये जाऊन आपला अर्ज दाखल करावा. अर्जासोबत दहा रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प, मंडळाचा ठराव, दोन पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र (आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पॅन कार्ड इ.), जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, पत्ता पुरावा-लाईट बिलाची झेरॉक्स प्रत, मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास मागील वर्षाचा परवानगी आदेश व हिशोबपत्रक इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करताना हि कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावेत. तसेच ऑफलाईन अर्ज करताना कागदपत्र अर्जासोबत जोडवीत, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले असून या प्रमाणे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.
No comments:
Post a Comment