खळबळजनक.. 'कोपर्डी' अत्याचार प्रकरणातील फाशीची शिक्षा असणाऱ्या कैदयाने घेतली कारागृहात गळफास.. पुणे :-महाराष्ट्रात नव्हे तर देशात खळबळ माजलेले'कोपर्डी'अत्याचार प्रकरण याबाबत नुकताच माहिती समोर आली अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील खळबळजनक
बलात्कार व हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी व फाशीची शिक्षा झालेला जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याने आज येरवडा कारागृहात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. आज पहाटेच्या सुमारास कारागृह पोलीस गस्तीसाठी गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. कोपर्डी येथे सामुहिक बलात्कार व हत्या केल्याची घटना २०१६ मध्ये घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ आणि नितीन गोपीनाथ
भैलूमे अशा तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.येरवडा कारागृहातील बराकीमध्ये त्याने
गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले
असून घटनेचा तपास सुरु आहे.
No comments:
Post a Comment