पुणे:-खळबळजनक घटना नुकताच घडली
आहे.पुण्यातील बाणेर येथे दाजीचा खून
केल्यानंतर मेव्हण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.हा प्रकार मंगळवारी (दि. 12) पुण्यातील बाणेर येथील श्री समृद्धी सोसायटी मधील फ्लॅट नं. 201 येथे घडला आहे.घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. धनंजय साडेकर (वय 38) असे खून
झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर हेमंत
काजळे (वय-40) याने गळफास घेऊन
आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी
दिली आहे.श्री समृद्धी सोसायटी बाणेर पुणे फ्लॅट
नंबर 201 येथे हेमंत काजळे (वय 40)
यांनी त्यांचा दाजी धनंजय साडेकर(वय 38) याचा लोखंडी रॉड डोक्यात मारून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी हेमंत यांनी बहिनीस धनंजयचा खून केला असून स्वतः आत्महत्या करत असल्याचे कळवले होते.पुढील तपास चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment