उस्मानाबाद:-रेशनिंगचा काळा बाजार होत असल्याचे बातम्या प्रसिद्ध होत असताना तहसील कार्यालयात देखील भ्रष्टाचार होत असलेले अनेक उदाहरणे समोर येत असताना नुकताच लाच प्रकरणी माहिती पुढे आली असून याबाबत मिळालेली माहिती अशी की,रास्त भाव धान्य दुकानाच्या धान्य मागणी पत्रावर सही करण्यासाठी 9 हजार रुपये लाच घेताना उमरगा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार ( पुरवठा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. राजाराम
केलुरकर इरण्णा(वय–56 रा.श्री आई निवास, लक्ष्मी धाम कॉलनी,लातुर (तत्कालीन नायब तहसीलदार,पुरवठा, उस्मानाबाद. सध्या नेमणूक तहसील कार्यालय उमरगा) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि. 7) केली. याबाबत 48 वर्षाच्या व्यक्तीने
उस्मानाबाद एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार व त्यांच्या दोन मित्रांचे रास्त भाव धान्य
दुकान आहे. दुकानाच्या धान्य मागणी पत्रावर सही करण्यासाठी व दुकानावर कारवाई न करण्यासाठी राजाराम केलुरकर यांनी तिघांचा 3 महिन्याचा मासीक हप्ता असे एकुण 9 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी उस्मानाबाद एसीबीकडे तक्रार केली.एसीबीच्या पथकाने प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणीमध्ये धान्य मागणीपत्रावर
सही करण्यासाठी व दुकानावर कारवाई न
करण्यासाठी राजाराम केलुरकर याने
तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना केलुरकर याला गुरुवारी रंगेहात पकडले. त्याच्यावर आनंदनगर पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप आटोळे,अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद
एसीबी पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम
म्हेत्रे,पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले,
विष्णू बेळे, विशाल डोके, नागेश शेरकर
यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment