खळबळजनक...नगरपरिषदेतील मुख्याधिकारी,महिला अभियंता,लेखापाल करप्शनच्या जाळ्यात;ठेकेदाराकडून लाच घेतल्याचं प्रकरण आलं अंगलट...
पुणे:- लाचखोरीचे प्रमाण वाढत असल्याने अधिकारी वर्गात लाचखोरीत ज्यादा प्रमाण वाढले असल्याचे अनेक बातम्यांचा वरून कळतंय,अधिकारी व कर्मचारी लाच घेताना या आरोग्य विभागाला पुरवठा केलेल्या
साहित्याचे बिल काढण्यासाठी 8 हजार
रुपये लाच घेताना पुणे जिल्ह्यातील
राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी,
आरोग्य विभागाच्या अभियंता आणि
लेखापाल यांना लाच घेताना रंगेहाथ
पकडण्यात आले. एसीबीच्या पथकाही कारवाई बुधवारी (दि. 13) राजगुरु नगरपरिषदेच्या कार्यालयात केली. आरोग्य विभागाच्या अभियंता चारुबला राजेंद्र हरडे (वय 31), लेखापाल प्रवीण
गणपत कापसे (वय 35) मुख्याधिकारी
श्रीकांत अ (वय 35) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.याबाबत 29 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे सरकारी ठेकेदार असून,त्यांनी राजगुरू नगरपरिषद, खेड येथील आरोग्य विभागाला लागणारे साहित्य पुरवले होते. त्याचे एकूण 80 हजार 730 रुपयांचे बिल त्यांनी नगरपरिषदेमध्ये सादर केले होते. हे बिल काढून देण्याकरिता आरोग्य विभागाच्या अभियंता चारुबला हरडे यांनी 8 हजार रुपयांची लाचेची मागणी
केली. तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार के एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि. 11 )आणि मंगळवारी (दि. 12) पंचासमक्ष पडताळणी केली असता चारुबला हरडे यांनी बिल मंजूर करण्यासाठी 8 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.पथकाने बुधवारी राजगुरुनगर नगरपरिषद मध्ये सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना हरडे यांना रंगेहाथ पकडले. तर लेखापाल प्रवीण कापसे आणि मुख्याधिकारी श्रीकांत लाळगें यांनी हरडे यांना लाच
स्विकरण्याकरिता प्रोत्साहन दिले.एसबीने तिघांवर खेड पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पुणे एसीबीचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर पोलीस अंमलदार शिल्पा तुपे, आशिष
डावकर, चालक माळी यांच्या पथकाने
केली.
No comments:
Post a Comment