गौरी -गणपती सणानिमित्त माझी इकोफ्रेंडली गौराई;गौरीआरास स्पर्धेचे आयोजन..!
बारामती : येथील रागिणी फाऊंडेशच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गौरी -गणपती सणानिमित्त माझी इकोफ्रेंडली गौराई गौरीआरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम व अटी -
1)स्पर्धकाने आपली नावनोंदणी ९१४६१७७६४५ व ९८८१०९८१३८ या क्रमांकावर संपर्क साधून निश्चित करावी.
2) ‘पर्यावरण पूरकआरास ‘व ‘समाजप्रबोधनपर संदेश’ असे दोन निकष विचारात घेतले जातील.
3)स्पर्धकाने व्हीडीओ तयार करताना स्वत ; गौरी आरास ची माहिती द्यावी.गाणी टाकून तयार केलेले व्हिडीओ स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाहीत.
4)व्हिडीओ ३ मिनिटांचा तयार करावा. स्पर्धकाने व्हीडीओ तयार करताना मोबाईल आडवा धरावा. व्हीडीओ २६ सप्टेंबर २०२३ पर्यंत ९१४६१७७६४५ या क्रमांकावर पाठवावेत.
5)स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १०० रु ९१४६१७७६४५ या मोबाईल क्रमांकावर फोन पे करावे.
6)रागिणी वूमेन्स क्लब च्या सभासदांसाठी प्रवेश विनामूल्य
7)स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची प्रथम ,द्वितीय ,तृतीय,उत्तेजनार्थ बक्षिसाकरिता निवड केली जाईल , विशेष आकर्षण (3) अशी एकूण 7 बक्षिसे देण्यात येतील . प्रत्येक सह्भागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
बक्षीस वितरण कार्यक्रम 1ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न होईल.
तरी जास्तीत जास्त स्पर्धेकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन रागिणी फाऊंडेशन बारामती व लीनेस क्लब बारामती यांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment