धक्कादायक..पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय;पोलिसात तक्रार देऊनही दखल घेत नसल्याने पतीने घेतला गळफास..
सांगली:- अनैतिक संबंध व त्याबाबत असलेल्या संशयामुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले असल्याचे अनेक उदाहरणे आहेत, तर अनेकांचे बळी गेले आहे,याबाबत नुकताच एक घटना समोर आल्याची माहिती मिळालीय पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने पतीने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचा
धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील जत शहरात धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करताना पतीने
मोबाईलवर व्हिडीओ शूटींग केले. या व्हिडीओमध्ये त्याने आत्महत्या करण्याचे कारण सांगितलं आहे.पत्नीसह सासरच्यांवर गंभीर आरोप केला आहे,पत्नीच्या अनैतिक संबंधाचा आरोप करत सांगलीच्या जतमधील एकाने मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना
समोर आली आहे. जत शहरातील दत्त कॉलनीतील दत्तात्रय निंगाप्पा कोळी (वय 46 ) यांनी ही आत्महत्या केली आहे.पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत सासू व
इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहून कोळी यांनी स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यामध्ये झाली असून या प्रकरणी मृत कोळी यांच्या पत्नी व सासूसह चौघां
विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल
पत्नी सुश्मिता, सासू शोभा शिवगोंडा माळी, बाबुराव कागवाडे व सुनील कागवाडे (सर्व रा. जत) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी दत्तात्रय यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.रुक्मिणी सदाशिव कोळी यांनी फिर्याद दिली. दत्तात्रय कोळी दत्त कॉलनीमध्ये राहण्यास होते. मृत्यूपूर्वी त्यांनी
मोबाइलवर एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये आपली पत्नी व तिच्यासोबत असलेल्या कागवाडे नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख केला आहे.चिठ्ठीत पोलिसांवरही गंभीर आरोप केल्याचे समोर येतंय जत पोलिसांत चारवेळा तक्रार करूनही दखल न घेतल्याने कंटाळून आत्महत्या करत असल्याचाही उल्लेख आहे. सासू देखील माझ्या पत्नीलाच साथ देत होती. माझ्या पत्नीमुळे आत्महत्या करीत आहे, असा व्हिडीओमध्ये उल्लेख आहे.हा व्हिडीओ दत्तात्रय यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला.
याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नसली तरी अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment