टकार कॉलनीचा राजा क्षत्रिय तरुण मंडळाच्या गणपतीच्या आकर्षक मिरवणुकीने जिंकली भाविकांची मने... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 30, 2023

टकार कॉलनीचा राजा क्षत्रिय तरुण मंडळाच्या गणपतीच्या आकर्षक मिरवणुकीने जिंकली भाविकांची मने...

टकार कॉलनीचा राजा क्षत्रिय तरुण मंडळाच्या गणपतीच्या  आकर्षक मिरवणुकीने जिंकली भाविकांची मने...
बारामती:-दहा दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला ,गणेश ,गौरीच्या आगमनाने पावसाचे देखील आगमन मोठ्या दिमाखात झाले आणि खऱ्या अर्थाने चिंतेत असलेल्या शेतकरी सुखावला गेला,या गणेशोत्सव काळात विविध गणेश मंडळांनी आपल्या परीने गणेशोत्सव साजरा केला असाच गणेशोत्सव मिरवणुकीत विद्युत रोषणाई करून आकर्षक असे मंदिराचा देखावा बारामती शहरातील क्षत्रिय नगर, टकार कॉलनी येथील सिद्धिविनायक विकास प्रतिष्ठान संलग्न असणाऱ्या क्षत्रिय तरुण मंडळाने केला या सुंदर आकर्षक देखाव्याच्या रोषणाईने भाविकांची मन प्रसन्न झाले,तर बारामती नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी क्षत्रिय तरुण मंडळाचा गौरव केला यावेळी मा. उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड,मंडळाचे अध्यक्ष लखन(वस्ताद)गायकवाड यांनी हा सन्मान स्वीकारला या गणेश मंडळासाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य व महिला भगिनी समाज बांधव, मित्र परिवार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. बारामतीतुन निघालेल्या या गणपती मिरवणुकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment