बारामती:-बारामती काही भाग विकासाच्या दिशेने वाटचाल करीत चाललेला दिसत आहे,असे असताना रस्त्यावर वाहनांची गर्दी तसेच नागरिकांची रहदारी वाढत आहे,तर शाळा,कॉलेज परिसरात रोडरोमिओंची धूमस्टाईल चालविण्याऱ्या टू व्हीलर गाड्याची धास्ती रस्त्यावरून जाणाऱ्या व त्यालगत रहात असलेल्या स्थानिक नागरिकांना होऊ लागला आहे भरधाव वेगाने चालवीत जाणारी रोडरोमिओं नेहमी पाहायला मिळत असल्याचे अनेकांनी बोलताना सांगितले. कॉलेज व शाळा परिसरात पोलीस कधी येतात तर कधी येत नाही अशी अवस्था झाली असून भरधाव वेगाने वाहन चालकांबरोबर अनेक वाद देखील स्थानिक लोकांचे झाले आहे,अनेक वेळा मित्रांना बोलावून मारामारी झाल्याचा घटना घडल्या आहे, यातूनच गुन्हेगारी वाढत असून अशी गुन्हेगारी वेळीच ठेचून काढणं गरजेचं आहे अशी मागणी नागरिकांच्यातुन होत आहे. टी सी कॉलेज परिसर असो, विद्या प्रतिष्ठान परिसर असो,शाहु हायस्कूल परिसर असो की म ए सो हायस्कूल परिसर असो व क्लासेसचा परिसर असो याठिकाणी आजूबाजूला रस्त्यावर सर्रास रोडरोमिओं उभा असलेले दिसतात मुलींकडे वाईट नजरेने पाहणे गाडीचे हॉर्न वाजविणे, मोठ्या आवाजात सायलसंर चा आवाज करणे,ट्रिपल सीट बसून गिरक्या मारणे असे प्रकार शाळा कॉलेज भरताना व सुटताना दिसतात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जी मुलं शिकत नाहीत ते देखील या परिसरात भटकताना दिसतात अश्या या त्रासाला पालक, नागरिक वैतागलेल्या आहे कारण तक्रारी केल्या तर हेच रोडरोमिओं गुंड लोकांना आणून वाद घालतात मारामारी करतात असेही प्रतिक्रिया देताना नागरिकानीं बोलून दाखविले आहे, याबाबत कारवाई साठी पाऊल उचलावे अशी मागणी होत आहे.
Post Top Ad
Monday, September 11, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
शाळा,कॉलेज परिसरात रोडरोमिओंचा प्रताप.!नागरिकांच्यात वाढलाय यांच्या त्रासामुळे संताप..!!
शाळा,कॉलेज परिसरात रोडरोमिओंचा प्रताप.!नागरिकांच्यात वाढलाय यांच्या त्रासामुळे संताप..!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment