बारामती:-राजकिय उलथापालथ झाल्यानंतर रंगत असलेल्या आरोपप्रतिरोपच्या फेऱ्या यातच काही महिन्यांवर लोकसभा निवडणूका लागण्याची शक्यता, अशातच अजितदादा पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आता बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे.अशातच आता येत्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रावहिनी पवार या निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
होत असल्याने. याबाबत प्रश्न विचारला असता खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाले की,बारामती लोकसभा निवडणुकीत कुणीही उमेदवार असेल तरी त्याचं स्वागतच आहे.आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत कुणीही
निवडणूक लढवू शकतं,असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या आहेत.नुकताच बारामतीत खासदार सुप्रिया ताई सुळे यांचा दौरा झाला यादरम्यान बारामती शहरातील विविध गणेश मंडळांना भेट दिली, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील लोकसभेच्या तयारीला लागा असे कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहे यावरून सद्या तरी राजकीय वातावरण तापत असलं तरी बारामती लोकसभेची मात्र चर्चा जोरात असून याआधी देखील भारतीय जनता पार्टी ने ठाम केले आहे बारामती ची जागा आम्हीच जिंकणार त्यामुळे येणाऱ्या काळात कळेलच त्यामध्येच आत्ता उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या घरातीलच लोकसभेला उमेदवार येणार? तो मग पार्थ असू अथवा सौ. सुनेत्रा वहिनी असो या नावाचीच चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment