BMW कारच्या अपघातात गेला बारामतीत एकाचा बळी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, September 10, 2023

BMW कारच्या अपघातात गेला बारामतीत एकाचा बळी...

BMW कारच्या अपघातात गेला बारामतीत एकाचा बळी...                                                                    बारामती:- अपघाताचे सत्र चालू असून बेफिकीरपणे वाहन चालवून एखादा चा जीव जाईल याची पर्वा न करता भरधाव वेगाने वाहने चालवीत असल्याचे अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे नुकताच अशीच एक घटना घडली असून त्यामध्ये एकाचा जीव गेला असल्याचे कळाले याबाबत मिळालेली माहिती अशी की,बारामती तालुका पोलीस स्टेशनला भा द वि कलम 304(2) अन्वये  गुन्हा दाखल झाला असून भाग 5 गु र नं  658/2023 भा द वि क 304(2) ,279,337,338,427 मोटार वाहन कायदा कलम 134,184 यानुसार नवनीत सिह देस्वाल  रा.आर्यसाई अपार्टमेंट मेडिकल कॉलेज चे पाठीमागे एमआयडीसी बारामती  जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून फिर्याद अनिल सुभाष पवार वय 34 वर्षे धंदा शेती रा.बाबासाहेब नगर पोकरी ता. महागव जि. यवतमाळ यांनी दिली,दि. 10/09/2023 रोजी  सकाळी 05/30 ते 06:00 वा दरम्यान मौजे एमआयडीसी पियाजो कंपनी समोर बारामती याठिकाणी झालेल्या अपघातात यातील फिर्यादीचा भाऊ सुनील सुभाष पवार वय 32 वर्षे हा मालुसरे वस्ती ता. बारामती जि.पुणे येथून एश्वर्या आलाईड फूड्स कंपनी एमआयडीसी बारामती जि पुणे येथे कामावरती जात असताना पांढरे रंगाची BMW कार वरील चालक नामें नवनीत शिंह देस्वाल रा आर्यासाई अपार्टमेंट मेडिकल कॉलेज चे पाठीमागे एमआयडीसी बारामती जि पुणे याने त्याचे ताब्यातील कार गाडी हयगयीने, अविचाराने भरधाव वेगाने व बेदकरपणे आपले गाडी चालवण्याने अपघात झाल्यास समोरच्या गाडीवरील जीव जाईल याची जाणीव असताना देखील कार जाणीवपूर्वक चालवून भाऊ सुनील सुभाष पवार याचे  मृत्यूस व मोटार सायकल ला पाठीमागून धडक देऊन अपघात करून चालक याने जखमीस कोणत्याही प्रकारची मदत न पुरविता मोटार सायकल नं mh 29, CA 1651 चे नुकसान करून सदर बाबत पोलीस स्टेशन ला माहिती न देता पळून गेला आहे वगैरे मजकुरावरून फिर्यादी यांची दखल घेत अंमलदार पोसई माळी यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पीएसआय डी.बी.लेंडवे हे तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment