अकलूज(प्रतिनिधी):- अकलूज शिवरत्न बंगला येथे सोलापूर जिल्ह्याचे नेते मा.श्री.आमदार रणजितसिंह दादा मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून माढा तालुक्यातील चांदज, आडेगाव, वडवली, गार अकोले, टाकळी आलेगाव, खुर्द रुई, आलेगाव बुद्रुक व इंदापूर तालुक्यातील टनु,गिरवी या गावांमधून चांदज येथे भीमा नदीवरून जाण्यासाठी पूलासाठी सुमारे 25कोटी मंजूर केल्याबद्दल आणि माढा तालुक्यासाठी विविध प्रकारच्या कामासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी माढा तालुका उपाध्यक्ष, सहकार महर्षी स.सा.कारखान्याचे संचालक गारअकोले ग्रा.पं.चे युवा उपसरपंच मा.श्री.गोविंद भाऊ पवार, बळीराम केचे, सतीश केचे, पंढरी चंदनकर, अशोक बिचकुले, अण्णा माने, कल्याण वाघमारे, गणेश सोलंकर, बाळासाहेब शेलार, अशोक केचे, नितीन केचे, लक्ष्मण शिंदे, विजय केचे, अरुण पवार, व ग्रामसथांनी दादांचा सन्मान करून आभार मानले.
Post Top Ad
Sunday, October 8, 2023
अकलूज येथे भीमा नदीवरून जाण्यासाठी पूलासाठी सुमारे 25 कोटी मंजूर..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment