बारामती:- शहरातील वसंतनगर परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना श्री अष्टविनायक गणेशोत्सव मित्र मंडळ व ओंकार भैय्या जाधव मित्र परिवाराच्या वतीने पंधरा प्रकारचे
किराणा माल साहित्य किट व साड्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र साहित्य केसरी
पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी संजय जाधव,उल्लेखनीय संघटनात्मक कार्याबद्दल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे
सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड, उत्कृष्ट महिला संघटक अमृता दास यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात
आले.यावेळी बारामतीच्या मा.नगराध्यक्षा
पौर्णिमा तावरे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, माजी नगरसेवक अमर धुमाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष विशाल
जाधव, सामाजिक कार्यकर्ते ओंकार जाधव, सयाजी गायकवाड, राहुल गायकवाड, सचिन जाधव, लखन गायकवाड उपस्थित होते.
No comments:
Post a Comment