फलटण ते पंढरपूर हा १०५ किमीचा रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयामार्फत पूर्ण करण्यात येणार.....
अकलूज(प्रतिनिधी):;फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग आता दृष्टीपथात आला असून मागील काही वर्षांपासून आपण या रेल्वे मार्गाच्या कामासाठी करत असलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भक्तांना, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदेशीर असणारा हा रेल्वेमार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वतः याकामी लक्ष घातले आणि आपल्या या कामाने वेग घेतला. फलटण ते पंढरपूर हा १०५ किमीचा रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मी तत्कालीन रेल्वे मंत्री पीयुष गोयल जी यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी पत्र देऊन मागणी केली होती. आज राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत हा रेल्वे मार्ग रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. याचा मनस्वी आनंद आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल अशी खात्री आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे आभार..!
No comments:
Post a Comment