खळबळजनक..वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आयुष्य संपवलं,एपीआयच्या पत्नीचा गंभीर आरोप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 7, 2023

खळबळजनक..वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आयुष्य संपवलं,एपीआयच्या पत्नीचा गंभीर आरोप..

खळबळजनक..वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आयुष्य संपवलं,एपीआयच्या पत्नीचा गंभीर आरोप..
सोलापूर:- आत्महत्या च्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे प्रामुख्याने नोकरदार वर्ग हा कामाच्या त्रासाला तर कुणी वरिष्ठांच्या त्रासाला तर कुणी मानसिक तणावातून आत्महत्या करीत असल्याचे उघड होत आहे, नुकताच नांदेड पोलीस दलातील एपीआय आनंद मळाले यांनी सोलापूरमधील कुमठा नाका येथील सोसायटीत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने राज्यातील
पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृत मळाले यांच्या पत्नी वंदना मळाले यांनी वरिष्ठ
अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. वंदना मळाले यांनी पत्रकारांना सांगितले की,माझ्या पतीला वरिष्ठांकडून खूप त्रास दिला जात होता.
गुन्ह्याच्या तपासकामी वरिष्ठ पोलीस अधिकारी दबाव आणत होते. त्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी वंदना मळाले यांनी केली. दरम्यान,सोलापूरच्या
शासकीय रुग्णालयात आनंद प्रकाश मळाले यांचा मृतदेहावर पोस्टमार्टमसाठी आणला होता. यावेळी सोलापूर पोलीस दलातील अधिकारी घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात उपस्थित होते.मृत आनंद मळाले यांच्या पार्थीवावर
अंतिम संस्कार त्यांच्या मुळ गावी आणला असताना पत्नी वंदना मळाले,मुलगा व आईने हंबरडा फोडला होता, यादरम्यान एपीआय आनंद मळाले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीला
व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवला होता.
या मेसेजमध्ये लिहिले असल्याचे समजते की, चिमू,पिल्लू मला माफ करा. मी तुमच्यासाठी
काही एक भरीव योगदान दिले नाही. माझ्या पश्चात तुम्ही दोघे जीवाचे रान करुन चांगल्या भविष्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल.
पिल्लूला माझे शुभ आशीर्वाद व त्याच्या उज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. माझ्या पँटच्या डाव्या खिशात चिठ्ठी आहे.असा मेसेज अगोदर करण्यात आला होता.अधिक तपास पोलीस करीत आहे.

No comments:

Post a Comment