बारामतीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन...
बारामती ( वार्ताहर ):- बारामती येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती शहरातील महार वतनातील मालकी हक्काच्या जागेवर एस.टी महामंडळाने बेकायदेशीरपणे ताबा घेवून अनुसूचित जातीतील नागरिकांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बारामती बस स्थानकास देण्यात यावे. या संदर्भात शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते
मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकापासून गुणवडी चौक, मारवाडी पेठ, गांधी चौक, भिगवण चौक या दिशेने काढून बारामती नगर परिषदे समोर निषेध सभा पार पडली यावेळी मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांच्या प्रमुख उपस्थित काढण्यात आला
यावेळी सभेत बोलत असताना निकाळजे म्हणाले कि बारामती बस स्थानकामध्ये गेलेल्या जागा या महार वतनी जागा आहेत या जागेचे सातबारे आजही या मूळ मालकांच्या नावावरती आहेत या जागेचा मोबदला मूळ मालकांना देण्यात आलेले नाही किंवा या जागे बाबत पूर्वसूचना, नोटीस, अथवा कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार मूळ मालकाना करण्यात आलेला नाही त्याउलट बेकायदेशीरपणे या जागेवरती अतिक्रमण करून बस स्थानकाचे काम सुरु आहे तरीही मूळ मालकांना मोबदला मिळावा तसेच या जागा महार वतनी असल्यामुळे या समाजाचे श्रद्धास्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नाव बारामती बस स्थानकास देण्यात यावे या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत तसेच जर शासनाने याची दाखल घेतली नाही तर या पेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख वैभव कांबळे, तालुका अध्यक्ष रामदास जगताप, बारामती शहराध्यक्ष ऍड.रियाज खान यांनी या बेकायदेशीरपणे बळकवलेल्या जमिनीच्या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवून शासनाने या मागण्याचा विचार करून लवकरात लवकर या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली तसेच रिपब्लिकन सेनेचे प्रशांत सोनवणे, यांनी मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला यावेळी सुजय रणदिवे, इंदापूरचे ऍड संतोष कांबळे, बारामती शहर उपाध्यक्ष जितेंद्र कवडे, सचिव विनय दामोदर, सुरज गव्हाळे, आनंद जाधव, सागर गवळी, अशोक कुचेकर, मोहन शिंदे, शाखाध्यक्ष सुमित सोनवणे, आदेश निकाळजे, मयूर मोरे, माळेगाव शहराध्यक्ष अण्णा घोडके, किशोर मोरे, आदींचा गणेश थोरात तसेच कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment