पुणे:-विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जि.पुणे यांच्या वतीने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वकिली व्यवसायास (practice) ला 100 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधुन कायद्याचे रक्षक- राज्यस्तरीय महाराष्ट्रातील नामांकित वकीलांचा व वकिली व्यवसायामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संविधान रत्न राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन वडगाव मावळ येथे करण्यात आले होते त्यामध्ये अँड.विनोद जावळे यांना वकिली व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल *संविधान रत्न* या पुरस्काराने सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲड.रंजना ताई भोसले ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष अँड मा जयदेवजी गायकवाड, भिमा कोरेगाव आयोगाचे ज्येष्ठ अँड.बी जी बनसोडे तसेच महाराष्ट्र चे विविध जिल्हे आणि तालुक्या मधील वकील बंधु आणि भगिनी उपस्थित होते.
अँड.विनोद जावळे यांना वकिली व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल *संविधान रत्न* या पुरस्काराने सन्मानित..
No comments:
Post a Comment