सुपा पोलीसांनी शेतक-याचे विद्युत मोटार पंप व केबल चोरणारी दोन जणाला जेरबंद करून केले एकुण ८ गुन्हे उघड... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 20, 2023

सुपा पोलीसांनी शेतक-याचे विद्युत मोटार पंप व केबल चोरणारी दोन जणाला जेरबंद करून केले एकुण ८ गुन्हे उघड...

सुपा पोलीसांनी शेतक-याचे विद्युत मोटार पंप व केबल चोरणारी दोन जणाला जेरबंद करून केले एकुण ८ गुन्हे उघड...
बारामती:- दिनांक १६/१०/२०२३ रोजी रात्रौ रात्रगस्त करीता सपोनि पाटील, पो. हवा / १८४३ भाग्यवंत, होमगार्ड खोमणे, होमगार्ड मोरे असे मिळुन रवाना झालो असता सपोनि पाटील याना मिळालेले गोपनीय माहितीचे आधारे पो. हवा / १८४३ भाग्यवंत, होमगार्ड मोरे व सपोनि पाटील, होमगार्ड खोमणे अशा दोन टीम बनवुन शेरेवाडी परिसरात रात्र गस्त करीत असताना एक संशयित विना नंबरची ज्युपीटर स्कुटी मोटार सायकल भरधाव वेगाने शेरेवाडी, लोणी पाटी मार्ग तरडोली गावाचे दिशेने गेली. सदर गाडीचा पाठलाग करून संशयित मोटार सायकल थांबवुन मोटार सायकलवरील दोन इसमांना त्याचा नांव पत्ता विचारता त्यानी त्याचे नांवे १) सुनिल हनुमंत रेवडे वय ३० वर्षे रा. शेरेवाडी ता. बारामूती जि. पुणे २) विश्वनाथ श्रीरंग कांबळे वय ३२ वर्षे रा. तरडोली ता. बारमाती जि. पुणे असे असल्याचे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याचेकडे २ हातोडे, २ एक्सपाने, १ एक्सा ब्लेड मिळुन आले त्यावेळी वरील नमुद इसमांकडे सखोल चौकशी केली असता त्यानी शेरेवाडी, बाबुर्डी, मोरगाव, सुपे, पानसरेवाडी व काळखैरेवाडी या गावचे परिसरातील शेतक-यांचे ६ विदयुत मोटार पंप, व ५ ठिकाणचे ६१५ फुट तांब्याची केबल चोरलेचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. नमुद इसमांना सुपा पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हयामध्ये अटक करून त्याचेकडुन ०१ मोटार सायकल, ०६ विदयुत मोटार पंप व ६१५ फुट तांब्याची केबल असा एकुण १,६८, ७३८ /- रूपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा / १८४३ राहुल भाग्यवंत व पो.हवा / २१८७ रूपेश साळुके हे करीत आहेत. सुपा पोलीस स्टेशन कडील खालीलप्रमाणे एकुण ०८ गुन्हे उघड करण्यात आले आहेत.दाखल गुन्हा 1) 21/2023 I.D.V. दंड 379,34   २) २५/२०२३ आयपीएल पेन ३७९, ३४   ३) २६/२०२३ आयपीएल पेन ३७९, ३४   4) 29 / 2023 आयडीव्ही पेन 379, 34     5) 28 / 2023 आयडीव्ही पेन 379, 34  6) 30/2023 I.D.V. कर्नल 379, 34   7) 31/2023 I.D.V. पेन 379,34   8) 616/2023 I.D.V. दंड 379,34 अशी सदरची कारवाई ही मा. अंकित गोयल, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा. आनंद भोईटे अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, मा. गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री नागनाथ पाटील समते, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, सहा. पोलीस उपनिरीक्षक वसंत वाघोले, भालचंद्र साळुखे, पो.हवा / १८४३ राहुल भाग्यवंत, पो.हवा / २९८७ रूपेश साळुके, पो.ना / १३६१ संदिप लोंढे, म.पो.ना दिपाली मोहिते, पो.कॉ महादेव साळुके, तुषार जैनक, होमगार्ड खोमणे, होमगार्ड मोरे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment