*स्वच्छतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार*
बारामती:-महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता हीच सेवा या अभियानाअंतर्गत बारामती नगरपरिषद मार्फत आज दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास हा उपक्रम राबविण्यात आला. या शासनाच्या स्वच्छता मोहीम मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बारामतीचे लोकप्रतिनिधी या नात्याने अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते कवी मोरोपंत शाळा आमराई या ठिकाणी स्वच्छ्ता करून अजित दादांनी या देशव्यापी अभियानाची सुरुवात केली.तसेच या कार्यक्रमासाठी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामतीच्या अध्यक्षा सूनेत्रावहिनी पवार यांनी देखील आपला सहभाग नोंदवून बारामती शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान दिले. तसेच अजितदादांनी जवळपास एक तासाहून अधिक काळ कऱ्हा नदी पात्र,शादी खाना, कवी मोरोपंत शाळा, अश्या विविध ठिकाणी सुरू असलेल्या श्रमदानात स्वतः सहभाग घेतल्यामुळे बारामती शहरात जवळपास ९१ ठिकाणी विविध सामाजिक संस्था, गणेश मंडळ, महिला बचत गट, शाळा महाविद्यालय, स्वच्छता कर्मचारी, व नागरिक यांच्या श्रमदानाचा उत्साह अधिक वाढला.
१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा राबवला जात आहे.याच अभियानाचे औचित्य साधत आज बारामती शहरात एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या देशव्यापी अभियानात बारामती नगर परिषदेकडून स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती यासाठी श्रमदान करणाऱ्या नागरिकांना श्रमदानासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच सदर अभियानाद्वारे सुमारे १५ टन कचरा नगरपरिषदेच्या ३८ घंटागाड्या ६ ट्रॅक्टर यांच्या मार्फत संकलित करण्यात आला. बारामती शहरातील जवळपास ७ हजार हुन अधिक नागरिक यांनी एकाच वेळी सहभागी होत स्वच्छतेसाठी श्रमदान केले. या अभियानात एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया चे सदस्य, सह्याद्री फाउंडेशनचे सदस्य,तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय व विद्या प्रतिष्ठानचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, तसेच बारामती नगर परिषदेमधील सर्व शाळा व शहरातील खाजगी शाळांचे विद्यार्थी व शिक्षक, विविध सामाजिक संघटना, श्री गणेश मंडळ, महिला बचत गट, व नागरिक बारामती नगर परिषदेचे अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, उपस्थित होते. बारामती शहरातील सार्वजनिक, धार्मिक, सरकारी कार्यालय, हॉस्पिटल, शाळा महाविद्यालय कऱ्हा नदी परिसर, दशक्रिया घाट, परिसर अश्या एकूण ९१ ठिकाणी स्वच्छतेसाठी विविध नागरिक यांच्या सोबतीने हे देशव्यापी स्वच्छतेचे अभियान सरकारी अभियान न राहता सर्व नागरिकांच्या श्रमदानाने हे अभियान एक लोक चळवळ बनवण्याचे प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment