धक्कादायक..अनधिकृत्या शाळा सुरु करुन पालकांकडून उकळले भरमसाठ पैसे..गुन्हा दाखल. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 27, 2023

धक्कादायक..अनधिकृत्या शाळा सुरु करुन पालकांकडून उकळले भरमसाठ पैसे..गुन्हा दाखल.

धक्कादायक..अनधिकृत्या शाळा सुरु करुन पालकांकडून उकळले भरमसाठ पैसे..गुन्हा दाखल.
 पुणे:-नुकताच अकॅडमी व क्लासेसचा काही तक्रारी दाखल झाल्या व त्यावर कारवाई सुरू करणार असल्याचे सांगण्यात आलं,  असं असताना शाळा, हायस्कूल मध्ये व्यवस्थित शिकवले जात नसल्याने आम्ही अकॅडमी किंवा क्लासेसचा आधार घेतो म्हणून आमची मुलं पास होतात अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी केली होती याचा अर्थ शाळा कशाला हव्यात त्यातही काही ठिकाणी शासन नियमानुसार नसल्याचे उघड झाले आहे याबाबत मिळालेली माहितीनुसार शाळेत मुलांना प्रवेश  देण्याच्या
नावाखाली पालकांकडून भरमसाठ पैसे
उकळल्याचा धक्कादायक प्रकार नऱ्हे येथील आर्यन पब्लिक स्कुलच्या संस्थाचालकासह
मुख्याध्यापीकेवर गुन्हा दखल झाला असून शाळा सुरु करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या
नियम व अटी तसेच कोणत्याही कागदपत्रांची पुर्तता न करता शाळा सुरु केली. शाळेत मुलांना प्रवेश देण्याच्या नावाखाली पालकांकडून भरमसाठ पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार
उघडकीस आला आहे. याप्रकरणी नन्हे येथील आर्यन पब्लिक स्कुलच्या शाळेच्या संस्थाचालकासह मुख्याध्यापीकेवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अशोक श्रीरंग गोडसे
( वय - 50 रा. मगरपट्टा, हडपसर) यांनी
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आर्यन पब्लिक स्कूलचे संस्थाचालक आर्यन सुर्यवंशी उर्फ संतोष चौरे व मुख्याध्यापीका माधुरी सुर्यवंशी व इतरांवर
आयपीसी 420, 465, 468, 471,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 16 जून 2022 ते 11 ऑक्टोबर 2023 दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नन्हे
येथील आर्यन पब्लिक स्कुलच्या संस्थापक व शाळेच्या मुख्याध्यपीका व इतरांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचा भंग केला. आरोपींनी
शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी
तसेच कोणत्याही कागदपत्रांची पुर्तता न करता शाळा सुरु ठेवली. शाळेत अनधिकृतरित्या विद्यार्थ्यांची भरती करुन पटावर नोंदणी करुन घेतली.तसेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश
देण्यासाठी पालकांकडून अनधिकृतरित्या भरमसाठ फी वसूल केली. शाळा अनधिकृत
असताना आरोपींनी अधिकृत असल्याचे भासवून
विद्यार्थ्यांचे दाखले व इतर कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच इतर शाळांकडे शाळा सोडल्याचे दाखले मागून शासनाचा महसूल बुडवला. शासनाची,पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक संस्थाचालक केल्याप्रकरणी आर्यन सुर्यवंशी
उर्फ संतोष चौरे व मुख्याध्यापीका माधुरी सुर्यवंशी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
केला आहे. पुढील तपास सहायक
पोलीस निरीक्षक यादव  करीत आहेत.

No comments:

Post a Comment