उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण,ट्विटद्वारे मिळाली माहिती..
मुंबई :-बारामतीत मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसला असल्याचे माळेगाव कारखान्यावर झालेल्या मराठा आंदोलनामुळे दिसून येत आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गाव बंदी करण्यात आली यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून पुण्याला रवाना झालेल्या अजित पवारांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची ट्विटद्वारे माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक
कार्यक्रमांत उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र या चर्चांना उत्तर देताना प्रफुल्ल पटेलांनी हे ट्वीट केलं आहे,डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. तसेच डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. अजित पवारांची तब्येत अचानक बिघडल्याने चाचणी केली अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. प्रफुल्ल पटेल आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, अजित पवारांना शनिवारी डेंग्यूचे निदान झाले आहे. डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.अजित पवार नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत.अजित पवार पूर्ण बरे झाले की ते पुन्हा जनतेच्या सेवेसाठी परततील अजित पवारांवर सध्या घरातच उपचार सुरू आहेत.राज्यात अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या सुरु झाल्या. मराठा आरक्षणवरून त्यांचा बारामतीचा दौरा
रद्द झाला. सकल मराठा समाजाच्यावतीने पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्याने त्यांच्या दौऱ्यासाठी देखील मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. दुपारी एक वाजता अजित पवार माळेगाव साखर कारखान्यातील मोळी पुजनासाठी जाणार होते. मात्र त्यांना गावबंदीचा
फटका बसल्याचं दिसत आहे. मराठ्यांचा आक्रोश पाहून अजित पवारांनी बारामती बारामती दौरा रद्द केला असावा किंवा टाळलं असावं अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. बारामतीला जाण्याऐवजी अजित पवार पुण्यात दाखल झाले आहेत.सद्या बारामतीत डेंग्यूच्या औषधांची फवारणी होत नसल्याने अनेक घरात डेंग्यूचे पेशंट आहे मात्र बारामती नगर परिषद याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे अनेकांनी नाराजी व्यक्त करीत सांगितले,कदाचित बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार भल्या पहाटे विकासाची कामे पहात असतात अश्यावेळी डेंग्यूची लागण तर झाली नसेल ना अश्या प्रतिक्रिया उमटत आहे.
No comments:
Post a Comment