बारामतीत काँग्रेस कमिटी विभागामार्फत ओबीसींच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 3, 2023

बारामतीत काँग्रेस कमिटी विभागामार्फत ओबीसींच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन..

बारामतीत काँग्रेस कमिटी विभागामार्फत ओबीसींच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन..
बारामती:-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विभागामार्फत ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन मा राष्ट्रपती भारत सरकार, राष्ट्रपती भवन नवी दिल्ली यांना बारामती तहसील यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर, बारामती युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश महाडिक, बारामती शहर अध्यक्ष ओबीसी विभाग सुरज येवले, पुणे जिल्हा सरचिटणीस सुरज भोसले, बापू आगम व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले.

1 संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करावी,

 2 लोकसभा राज्यसभा विधानसभा तसेच विधान परिषदेमध्ये महिला आरक्षणाचा ठराव संमत झाला असून33 % पैकी 15,% आरक्षण हे ओबीसी महिलाकरिता राखीव करण्यात यावे,

 3 नॉन क्रिमिनल ची अट संपूर्ण रद्द करण्यात यावी.

4 महाराष्ट्र शासनाने लागू केलेले कंत्राटी कामगार भरती निर्णय रद्द करण्यात यावा.

5 महाराष्ट्र शासनाने सरकारी शाळेचे खाजगीकरण करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा वरील मागण्यांचा योग्य तो निर्णय घेऊन ओबीसी प्रवर्गास न्याय द्यावा ही विनंतीचे पत्र तहसीलदार बारामती यांना देण्यात आले.

No comments:

Post a Comment