बिरजू मांढरे मित्रपरिवाराच्या माध्यमातून महिलांनी उत्स्फूर्तपणे केलेले रक्तदान हे
बारामती:-बारामती नुकताच सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मा. उपनगराध्यक्ष बिरजू भैय्या मांढरे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराच्या भेटी दरम्यान महिलांनी उत्स्फूर्तपणे केलेले रक्तदान हे महिलांसाठी आजवर केलेल्या कार्याची पावती आहे.या शिबिराच्या माध्यमातून समाजाची सेवा घडणार
असल्याचे मत बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे व मित्रपरिवाराच्या वतीने सुनेत्रा पवार यांच्या
वाढदिवसानिमित्त येथील चिराग गार्डनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा. अजिनाथ चौधर,माजी नगराध्यक्षा भारती मुथा, राजेंद्र बनकर, अभिजित
जाधव, सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण, सीमा
चव्हाण, डॉ. सौरभ मुथा, अमर महाडीक, नितीन
लोखंडे, समाधान गायकवाड, तानाजी सोनवणे, विनोद लोखंडे, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
शंभराहून अधिक महिला पुरुषांच्या बरोबरीने पुढे
घेऊन आवर्जून रक्तदान करतात, ही सामाजिक बदल दर्शविणारी गोष्ट असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. अपघात व इतर गंभीर रुग्णांना रक्ताची असणारी गरज लक्षात घेत हे शिबिर आयोजित केल्याचे बिरजू मांढरे म्हणाले. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment