पश्चिम महाराष्ट्र लोकसभा संयोजक मा. अशरफ वांकर यांचा बारामती लोकसभा दौरा..
बारामती= बारामती लोकसभा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.इद्रिसभाई मुलतानी यांच्या सूचनेनुसार लोकसभा महाविजय २०२४ संकल्प प्रवास अंतर्गत आज पश्चिम महाराष्ट्र लोकसभा संयोजक मा. अशरफ वांकर यांचा बारामती लोकसभा दौरा होता,३५ लोकसभा बारामती मतदार संघ व या अंतर्गत येणाऱ्या ६ विधान सभा संयोजक व सह संयोजक यांची बैठक भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा पश्चिम महाराष्ट्र लोकसभा संयोजक मा. श्री. अशरफ वांकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी बारामती लोकसभा संयोजक ऍड. अझहरुद्दीन मुलाणी, बारामती लोकसभा सह संयोजक आयुब शेख, पुणे ग्रामीण अध्यक्ष तथा बारामती विधानसभा संयोजक खलील काजी, सह संयोजक नजीर शेख, इंदापूर संयोजक समीर मुलाणी, सहसंयोजक शमसूद्दीन मुलाणी,शकील सय्यद,दौंड विधानसभा संयोजक नासिर पटेल, सह संयोजक फिलिप दाखले, फिरोज खान
भोर संयोजक नजीर शेख, सह संयोजक कदीर खान, बच्चू आतार पुरंदर विधानसभा संयोजक शब्बीर शेख, सह संयोजक नदीम इनामदार, अरबाज आतार, सहकारी जिल्हा उपाध्यक्ष रियाझ वंटमुरे उपस्थित होते.
बारामती लोकसभा अल्पसंख्याक बूथ सक्षमीकरण बाबत विस्ताराने चर्चा करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र संयोजक अशरफ वांकर यांनी बूथ रचनेबाबाबत उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment