शेळ्या चोरी करणारे टोळीचा म्होरक्या केला जेरबंद, सोळा गुन्हे उघडकीस आणून दोन लाख सहासष्ठ हजार रूपयांचे मुद्देमाल केला हस्तगत... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 31, 2023

शेळ्या चोरी करणारे टोळीचा म्होरक्या केला जेरबंद, सोळा गुन्हे उघडकीस आणून दोन लाख सहासष्ठ हजार रूपयांचे मुद्देमाल केला हस्तगत...

शेळ्या चोरी करणारे टोळीचा म्होरक्या केला जेरबंद, सोळा गुन्हे उघडकीस आणून दोन लाख सहासष्ठ हजार रूपयांचे मुद्देमाल केला हस्तगत... 
वालचंदनगर:- स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण ची कारवाई बारामती उप विभागातील वालचंदनगर परीसरात शेळया चोरीचे प्रमाण वाढले होते. सदरची बाब गंभीर असल्याने मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्ह्यांचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून आढावा घेवून सदरचे गुन्हे उघडकीस आणून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशा सुचना केल्या होत्या.स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अविनाश शिळीमकर यांनी पथकासह मा. अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी  बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शन घेवून पथकासह गुन्ह्यांचे घटनास्थळी भेटी देवून गुन्हे घडलेली वेळ तसेच, ठिकाणे तपासली. घटनेतील बारकावे शोधून काढून तपासाची दिशा ठरविण्यात आली. सदर गुन्हयांमध्ये काही संशयित आरोपींची नावे पुढे आली. त्यांचे हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली असताना दि २३/१०/२०२३ रोजी पहाटेच्या वेळी भरणेवाडी बोराटेवस्ती ता इंदापूर जि पुणे येथे वयोवृद्ध व्यक्तीस मारहाण तसेच दमदाटी करून चोरटयांनी शेळया व बोकड चोरून नेले. त्याबाबत वालचंदनगर पो स्टे येथे गुरनं ७७८/२०२३ भादंवि ३९२,३९५, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताबडतोब घटनास्थळी भेट दिली आणि संशयित आरोपींच्या हालचाली पडताळून सदरचा गुन्हा देखील त्यांनीच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने दि २५/१०/२०२३ रोजी टोळीचा म्होरक्या रवी महादेव चव्हाण वय ३२ वर्षे रा. माळीनगर चरवस्ती ता माळशिरस जि सोलापूर हा बावडा चौक येथे आला असल्याची माहिती मिळाल्याने त्यास पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीत सदरचा गुन्हा त्याने इतर चार साथीदारांचे मदतीने केल्याचे कबुल केले आहे. त्यास विश्वासात घेवून चौकशी करता त्यांनी सर्वांनी मिळून खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे सांगितले असून त्याचेकडून गुन्हयातील चोरी केलेल्या शेळयांची विक्री करून आलेली रक्कम रु. ३०,०००/- तसेच सहा शेळया, गुन्हयात वापरलेली चारचाकी व त्याचे ताब्यात मिळून आलेली चोरीची मोटार सायकल असा एकूण २,६६,०००/- किं. चा मुद्देमाल हस्तगत करणे आलेला आहे.1) वालचंदनगर गुरनं 778/2023 भादंवि 392,395,34 ,2) वालचंदनगर गुरनं 23/2023 भादंवि 379 ,4) वालचंदनगर गुरनं 65/2023 भादंवि 379,6) वालचंदनगर गुरनं 168/2023 भादंवि 379,8) वालचंदनगर गुरनं 305/2023 भादंवि 379,10) वालचंदनगर गुरनं 426/2023 भादंवि 379,12) बारामती तालुका गुरनं 83/2023 भादंवि 379,14) भिगवण गुरनं 28/2023 भादंवि 379,16 ) बारामती शहर गुरनं 911/2023 भादंवि 379
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल  पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.आनंद भोईटे बारामती विभाग, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो नि अविनाश शिळीमकर सपोनि कुलदीप संकपाळ,
पोसई अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे,अजय घुले, अतूल डेर, राजू मोमीण, निलेश शिंदे, वालचंदनगर पो स्टे चे सपोनि विक्रम साळुंखे, पोसई टेळकीकर,
पोलीस अंमलदार शैलेश स्वामी, गणेश काटकर, चांदणे, किसन बेलदारे, गणेश कळसकर यांनी केली असून आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास वालचंदनगर पोलीस स्टेशन करत आहे.पुणे ग्रामीण पोलीस 3) वालचंदनगर गुरनं 53/2023 भादंवि 379,5) वालचंदनगर गुरनं 69/2023 भादंवि 379,7 ) वालचंदनगर गुरनं 264/2023 भादंवि 379,9 ) वालचंदनगर गुरनं 319/2023 भादंवि 379,11) बारामती तालुका गुरनं 219/2023 भादंवि 379,13 ) भिगावण गुरनं 747/2023 भादंवि 379,15) इंदापूर गुरनं 168/2023 भादंवि 379 (मो.सा.चोरी)तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment