बारामती :-बारामती तालुक्यातील पारवडी येथील जाधव वस्ती येथे नुकताच एक विचित्र घटना घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की, घरगुती वादाच्या कारणावरून पतीच्या अंगावर उकळते गरम पाणी टाकून जीवे ठार
मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर मधुकर कुंभार (वय ३५, व्यवसाय चालक,रा. पारवडी जाधव वस्ती, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी कविता सागर कुंभार (वय २८, रा. पारवडी जाधव वस्ती, ता. बारामती) यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात. ही घटना
मंगळवारी (दि. १०) पहाटे पाच वाजताच्या सुमारास राहत्या घरी घडला. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,सागर आणि कविता यांच्यात प्रापंचिक कारणावरून वाद होता. या वादातुन कविता हिने पती सागर यास
जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर उकळते गरम पाणी तोंडावर, छातीवर, पोटावर, गुप्त इंद्रिय व पाठीमागील गुदद्वाराजवळील भागावर टाकले. त्यात त्याची कातडी ४० टक्के भाजली आहे. तसेच आरोपीने तेथे पडलेल्या लोखंडी चौकोनी छोट्या पाईपने फिर्यादीचे डोकीत व पाठीवर मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तुलाआता जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली आहे.
याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात आरोपी पत्नी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहूल घुगे करत आहेत.
No comments:
Post a Comment