धक्कादायक..मोरगावच्या तिर्थक्षेत्रात अवैध दारू धंदेवाल्याचा विळखा.! तर जोडीला चालु आहे जुगार,दारू,मटका..?
मोरगाव:- महाराष्ट्रात अष्टविनायक
पैकी एक प्रसिद्ध असणारे तीर्थक्षेत्र म्हणजे पुणे
जिल्ह्यातील व बारामती तालुक्यातील मोरगाव या गावात रोज हजारो भक्तगण बाहेरून येत असतात या मोरगावच्या मयुरेश्वराला येऊन दर्शन घेत असतात तसेच नुकताच दसरा हा मोठा उत्सव या गावात साजरा होत असताना पै पाहुणे या गावात मोठ्या संख्येने येत असतो अश्यावेळी पोलीस प्रशासन यांनी वेळीच दक्षता घ्यावी अशी मागणी होत आहे. अश्या या गावात पवित्र क्षेत्रात हॉटेल, ढाबा, घरगुती, टपऱ्या वर अवैध दारू विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्यामुळे पिणाऱ्याची संख्या देखील वाढत चालली आहे त्यामुळे अनेक संसार उध्वस्त होत आहे तर येणाऱ्या भक्तभाविकानाही या दारुड्या मुळे त्रास
होत असल्याचे कळतंय मात्र पोलीस व उत्पादन शुल्क विभाग वारंवार कारवाई करून देखील हे धंदे राजरोसपणे चालू आहे, या धंदे वाल्यावर कारवाई होते त्यावेळी त्यांना दारू विक्री करणारे मूळ डीलर यांच्या वर कारवाई का होत नाही हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे, म्हणे
नीरा व जेजुरी येथून ही दारू येत असून त्याच
प्रमाणात हात भट्टी देखील विकली जात आहे,
जोडीला मूर्टी, सुपे,मोरगाव,जेजुरी याभागातील मटका चालविणारे मालक या मोरगावात काहींना हाताशी धरून मटका चालवीत आहे तसेच जुगार देखील चालू असल्याचे कळतंय सुपे पोलीस स्टेशन हद्दीत जुगार क्लब चालू असल्याचे कळतंय नुकताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नव्याने सुपे येथील भव्य दिव्य पोलीस स्टेशन चे उदघाटन केले व जाहीर सभेत सांगितले की मी अवैध धंदे चाललेले खपवून घेणार नाही, याबाबत पोलीस अधिकारी यांना कल्पना दिली असून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात
आले आहे. तर लवकरच काही महिला संघटना याबाबत वरिष्ठ लेव्हलला तक्रार करणार असल्याचे समजले असून छोट्या दारू व्यावसायिका वर कारवाई करण्यापेक्षा
त्यांना दारू देणाऱ्या मालक व डीलर वर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे देखील सांगितले.
No comments:
Post a Comment