बारामतीत भारतीय जनता पार्टी च्या वतीने आयुष्यमान भारत योजनाचा कॅम्प राबविणार..
बारामती:बारामती येथे आयुष्यान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बारामती शहरात राबविण्यात येत असून बारामती नगर परिषदेचे कर्मचारी व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात आयुष्यमान भारत योजना राबविली जात आहे,भारत देशात १० करोड गरजू कुटूंबातील लोकांना प्राईवेट / सरकारी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार होतील,५० करोड लोकांना थेट फायदा,५ लाख प्रतिवर्षी मोफत उपचारा साठी उपलब्ध असणार आहे,भारतीय जनता पार्टी बारामती शहर घेऊन आलो आपल्या दारी..या उपक्रमाद्वारे आयुष्मान भारत योजना राबविताना भारतीय जनता पार्टीचे बारामती शहर अध्यक्ष सुजित वायसे, शहाजी कदम, संतोष जाधव, मुकेश वाघेला, संजय गिरमे, चंद्रकांत केंगार, मोहन मोरे व इतर नागरिक यावेळी सहभागी झाले होते, बारामती शहरात सगळीकडे हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सुजित वायसे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment