*झैनबिया स्कूलमध्ये सतर्कता जागृत सप्ताह साजरा*
कटफळ (ता:बारामती):- झैनबिया इंग्लिश मिडीयम स्कूल कटफळ व एचपी गॅस बारामती यांच्या सहकार्याने सतर्कता जागृत सप्ताहाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी "भ्रष्टाचार करू नका,राष्ट्रासाठी वचनबद्ध रहा"असा संदेश देण्यात आला. भ्रष्टाचार हा समाजासाठी शाप आहे.आपल्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी स्वीकारलेला शॉर्टकट म्हणजे भ्रष्टाचार. या प्रचंड गहन अशा विषयाला हात घालून भ्रष्टाचार विरुद्ध जागृती निर्माण करण्याचे काम झैनबिया स्कूल कटफळ मधील विद्यार्थ्यांनी केले. समाजात भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. "भ्रष्टाचार करू नका राष्ट्रासाठी वचनबद्ध रहा" या कार्यक्रमांतर्गत शाळेत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा घेण्यात आली. तसेच या भ्रष्टाचार निर्मूलन या विषयावर पथनाट्य देखील सादर करण्यात आली. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या 520 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री नितीन जैन, दक्षता अधिकारी व श्री.अलोक कुमार, वरिष्ठ अधिकारी एच.पी गॅस या मान्यवरांनी सहभागी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व कौतुक केले तसेच भ्रष्टाचार निर्मूलन या मोहिमेत विद्यार्थ्यांची कामगिरी महत्त्वाची व उत्स्फूर्त ठरेल असे त्यांनी सांगितले. तसेच श्री.शब्बीरभाई बारामतीवाला व श्री.अली अजगरभाई बारामतीवाला व शाळेच्या प्राचार्यां. इन्सिया नासिकवाला व शिक्षक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
No comments:
Post a Comment