खळबळजनक..ॲकॅडमी चालकावर गुन्हा दाखल,भरती करण्याचे आमिष दाखवून
महिलेवर लैंगिक अत्याचार..
पुणे:- ॲकॅडमीचा सद्या सुळसुळाट चालू असून या मध्ये अनेकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असताना बेकायदेशीर क्लासेस व ॲकॅडमी असल्याचे तक्रारी देखील आल्या असून यावर कारवाई कधी होईल, अशी प्रतिक्रिया उमटत असताना नुकताच एक खळबळ जनक घटना समोर आली परीक्षा न देता पोलीस भरती
करण्याचे आश्वासन देऊन एका महिलेवर लैंगिक
अत्याचार केल्याची घटना वानवडी येथील एका
ॲकॅडमीत घडली आहे. याप्रकरणी ॲकॅडमी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा
प्रकार 2 ऑगस्ट 2023 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान घडला आहे. आरोपीने पोलीस भरती करतो असे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे. याबाबत कॅम्प परिसरात राहणाऱ्या 31वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार अक्षय चंद्रशेखर प्रधान(वय-27 रा. सय्यदनगर,मोहम्मदवाडी, हडपसर) याच्यावर आयपीसी 376, 406, 420, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी अक्षय प्रधान याची वानवडी येथे अजिंक्य ॲकॅडमी आहे. त्याने फिर्यादी यांना गॅझेट अधिकारी असल्याचे सांगून परीक्षा न देत पोलीस भरती करतो असे आश्वासन दिले.त्यांना वारंवार ॲकॅडमीत बोलावून घेत
त्यांच्या सोबत जवळीक साधली. त्यांना रिलेशन शिपमध्ये राहु असे सांगितून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला सांगितले तर पोलीस भरती करणार नसल्याची धमकी दिली.तसेच फिर्यादी यांच्याकडून 1 लाख 30 रुपये, 14 हजार 500 रुपयांचा सॅमसंग फोन, 59 हजार रुपयांचा
आयफोन घेतला.आरोपीने मुला-मुलींचे पोलीस भरती झाल्याबाबत सत्कार केल्याचे फोटो
दाखवून इतरांकडून पैसे उकळले आहे.प्रत्यक्षात आरोपीने एकाही मुलाची किंवा मुलीची पोलीस दलात भरती केली नसून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment