बापरे..दोन नंबरचा धंदा पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू;या मंत्र्यांनी काढली पोलिसांची खरडपट्टी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 9, 2023

बापरे..दोन नंबरचा धंदा पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू;या मंत्र्यांनी काढली पोलिसांची खरडपट्टी..

बापरे..दोन नंबरचा धंदा पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू;या मंत्र्यांनी काढली पोलिसांची खरडपट्टी..
 पुणे:-दोन नंबरचे धंदे सध्या जोरात चालू असल्याचे अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहे पण त्यामध्ये चिरीमिरी तर कोणी मोठी तडजोड करून प्रकरणे हस्तका मार्फत मिटविल्याचे कळतंय नुकताच  पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये ड्रग्स माफियांचा तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये गॅस माफियांचा गोरखधंदा
सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गॅस
रिफिलिंग करताना स्फोट झाला. ही घटना रविवारी रात्री घडली. हीच घटना सकाळच्या सुमारास घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. हा स्फोट तानाजी सावंत यांच्या जेएसपीएम संस्थेच्या ब्लॉसम शाळेजवळ झाल्याने त्यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांची  चांगलीच खरडपट्टी केली. टँकरमधून गॅस चोरी करताना 9 टाक्यांचा स्फोट झाला. तीन स्कूल
बसेस जळून खाक झाल्या. या घटनेमुळे अख्ख पिंपरी चिंचवड शहर हादरून गेलं, स्थानिक नागरिकांनी भीतीपोटी घर सोडून बाहेर पडले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तासभर
पाण्याचा फवारा मारुन ही आग नियंत्रणात आली. या भीषण आगीमागे गॅस चोरीचा गोरखधंदा कारणीभूत असल्याचे समोर
आल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या
घटनेला पोलिसच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.दोन नंबरचा धंदा पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू होता असे सांगितले जात आहे,गॅस माफियांच्या हा हैदोस ससूनमधील ड्रग्स माफियांसारखाच आहे असं
म्हणत या काळ्याबाजाराला लागलेल्या भीषण आगीला पिंपरी चिंचवड पोलिसच जबाबदार
आहेत, असा थेट आरोप तानाजी सावंत  यांनी
केला. जेएसपीएम ही संस्था सावंत यांची आहे. याच संस्थेच्या ब्लॉसम शाळेजवळच्या मोकळ्या जागेत हा गोरखधंदा सुरु होता. त्यामुळे सावंत
यांनी भेट देऊन हा दोन नंबरचा धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदेंची
आरोग्यमंत्र्यांनी चांगलीच खरडपट्टी केली.

No comments:

Post a Comment