नियतीचा खेळच न्यारा...उपचार घेऊन घरी जाताना अपघातात तरुण मुलाचा जागीच मृत्यू तर आई गंभीर जखमी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 7, 2023

नियतीचा खेळच न्यारा...उपचार घेऊन घरी जाताना अपघातात तरुण मुलाचा जागीच मृत्यू तर आई गंभीर जखमी..

नियतीचा खेळच न्यारा...उपचार घेऊन घरी जाताना अपघातात तरुण मुलाचा जागीच मृत्यू तर आई गंभीर जखमी..

बारामती:-बारामतीत सद्या अपघाताचे पप्रमाण वाढल्याचे दिसत आहे रोज एखादी बातमी येतेच अपघात झाल्याची नुकताच बारामती शहरातील बारामती हॉस्पिटल येथून डिस्चार्ज घेऊन घरी परतत असताना अपघात झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तर आई गंबीर जखमी झाल्याची माहिती मिळाली,आज सांयकाळच्या सुमारास प्रशासकीय भवना समोरून जाणाऱ्या रिंगरोड वरती भरधाव वेगाने धावणाऱ्या दहाचाकी हायवा गाडीने दुचाकीवरून जाणाऱ्या माय-लेकाला जोरदार धडक दिली.या धडकेत 21 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे .तेजस विजय कासवे (वय 21 वर्ष) असं अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाच नाव असून आई राधिका कासवे या गंभीर जखमी झाल्या आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी कि तेजस हा दोन दिवसांपूर्वीच आपल्या नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी बारामती हॉस्पिटल येथे भरती झाला होता.डॉक्टरांनी काल त्याच्या नाकावर यशस्वी शत्रक्रिया केली होती.त्यानंतर डॉक्टरांनी त्याचावर आवश्यक ते उपचार करून आज रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी दिली होती.त्यानंतर तेजस आणि त्याची आई हे आपल्या दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले असता भरधाव वेगात आलेल्या हायवा ट्रकने त्यांना धडक दिल्याने तेजसचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.दरम्यान,या अवजड वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.RTO व पोलीस प्रशासनाने देखील अशा अवजड आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवरती अंकुश ठेवून त्यांच्यावर कडक अशी कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.तर दुसरीकडे रिंगरोडवरील दुभाजकांच्या मध्ये बारामती नगर परिषदेने लावलेली झाडे देखील अस्तव्यस्त वाढली असून व वाहने देखील मार्केट यार्ड रोड कडून येताना रस्त्यावर पार्किंग केलेले असतात त्यामुळे देखील रस्ता ओलांडत असताना अनेकदा दुसऱ्या बाजूने येणारे वाहन दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

No comments:

Post a Comment