*अभाविप च्या दिल्ली राष्ट्रीय अधिवेशनाचा लोगो प्रकाशित*
शिलॉंग:- दि.३० नोव्हेंबर २०२३ ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमृत महोत्सवाच्या ६९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा लोगो अभाविप च्या राष्ट्रीय उपाध्यक्षा पूनम सिंग, राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य निधी त्रिपाठी आणि राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार यांच्या हस्ते अखिल भारतीय पदाधिकारी बैठकीत शिलाँगमध्ये प्रकाशित करण्यात आला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे म्हणाले की, “यावर्षी अभाविपचे ६९ वे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत मोठ्या थाटात आयोजित केले जाणार आहे. ज्यामध्ये देशभरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक कार्यकर्ते देशाची संस्कृती, शिक्षण आणि सुरक्षा या विषयांवर विचारमंथन करतील. या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रवादाचा भाव पहायला मिळणार आहे. त्यासोबतच या अधिवेशनात दिव्य आणि भव्य लघु भारताचे दर्शन होणार असून देशातील विविध प्रांतातून वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या पोशाखांमध्ये आलेल्या प्रतिनिधींमध्ये भारताच्या एकता आणि अखंडतेचे दिव्य रूप पाहायला मिळणार आहे.
*अधिक माहितीसाठी संपर्क*
प्रगती कराड ९३५९१६५१४३
(प्रदेश मीडिया संयोजक, अभाविप पश्चिम महाराष्ट्र)
No comments:
Post a Comment