बारामतीत दोन दिवसीय दांडिया उत्साहात;नागरिकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी
बारामती दि.२४: यंदा बारामतीत आता पर्यंतचा सर्वात मोठा आणि भव्य दोन दिवसीय दांडिया उत्सव उत्साहात आणि नागरिकांच्या तुफान प्रतिसाद संपन्न झाला.शनिवार दि.२१ आणि रविवार दि.२२ ऑक्टोबर रोजी भिगवण रोड वरील बारामती क्लब येथे या दोन दिवसीय भव्य दांडिया उत्सव पार पडला.येथील बारामती बिगेस्ट डान्स सेंटर आणि बारामती क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या दांडिया उत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील हजेरी लावली.
या दांडिया उत्सवामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी आणि लहान चिमुकल्यांसाठी आयोजकांकडून स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते.यावेळी या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना आयोजकांच्यावतीने पीएनजी ज्वेलर्स आणि चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्याकडून आकर्षक पारितोषिके देखील देण्यात आली.तर हा दांडिया उत्सव यशस्वी करण्यासाठी माया मछिंद्र इव्हेंट्स,क्यारा लाईफस्टाईल आणि कियान क्लबचे विशेष सहकार्य लाभले.
दरम्यान,या दांडिया महोत्सवामध्ये शहरातील हजारो तरुण तरुणींसह अबालवृद्धांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून यंदा हे दांडिया उत्सवाचे पहिले वर्ष आहे.आणि या पहिल्याच वर्षी या दांडिया उत्सवाला मिळालेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद हा सुखावणारा असल्याचे यावेळी आयोजक सुमित मोहिते,विग्नेश शेट्टी,ओमकार शहासने,रोहित वाघमोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment