अकलूज(प्रतिनिधी):-रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या अन्नामुळे मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून, आता विषमुक्त अन्न उत्पादन अत्यंत गरजेचे झाले आहे. यावर सेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय असल्याने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न श्रीराम कृषी महाविद्यालय पानीव ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम – 2023 अंतर्गत दि. ६ ऑक्टोबर रोजी भव्य शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शन आनंदनगर, अकलूज (ता. माळशिरस) येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्राचे सेंद्रिय शेती प्रमुख श्री. जगन्नाथ मगर, श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. हाके एच. बी., आनंदनगर गावचे सरपंच श्री. राजेंद्र लोंढे, उपसरपंच श्री. गंगाधर चव्हाण, ग्रामसेवक श्री. नितीन शेलार, कार्यक्रम अधिकारी डाॅ. शेख जे. आय., श्रीराम कृषी महाविद्यालयाचे कृषीशास्त्र विभागाचे प्राध्यापक श्री. मदने के.टी. तसेच गावातील शेतकरी व कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी रासायनिक पद्धत टाळून सेंद्रिय शेती करण्याबाबत श्री. जगन्नाथ मगर यांनी मार्गदर्शन केले. गोपालन करत शेण व गोमुत्राचा वापर जमिनीच्या सुपीकतेसाठी कसा करावा हे त्यांनी सांगितले. यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो असे त्यांचे मत आहे. जैविक घटकांमुळे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पाणी वापरात लक्षणीय काटकसर करता येते. प्रत्येक शेतकऱ्याकडे एक तरी देशी गाय असावी असे त्यांनी ठामपणे सांगितले.
No comments:
Post a Comment