मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने बारामतीत विश्व शांततेसाठी दुआ..
बारामती:-भारत देशाच्या उन्नतीसाठी , प्रगतीसाठी अल्लाह पुढे सहामूहिक प्रार्थना (दुआ) करण्यात आली.यावेळी सर्व मशीदी मधील धर्मगुरु ( मौलाना) दुआ साठी आले होते. देशात विविध भागात पुरेसा पाऊस झाला नाही, त्यामुळे गरीब कष्टकरी शेतकऱ्यांवर जे संकटे ओढवली आहेत ती दूर व्हावीत म्हणून तसेच पृथ्वीतलावरती अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शांततेचे वातावरण निर्माण व्हावे आणि मानव जातीच्या भल्यासाठी अल्लाह पुढे सहामूहिक प्रार्थना (दुआ) करण्यासाठी मुस्लीम समाज बारामती यांनी चाँदशाहवली दर्गाह मैदानात आयोजन केले होते.
यावेळी भारता बरोबर जगभरात मानवता ही कुचकामी झाली असल्याने जिकडे तिकडे दुषित वातावरण झाले असल्याने अल्लाह ( भगवान) या पृथ्वीला चालवत असल्याने तमाम मुस्लिम समाज एकत्र येऊन अल्लाह चरणी शांतता व भारत देश महाशक्ती व्हावे यासाठी दुआ करण्यात आली.माणुस हा माणुस म्हणुन जगला पाहिजे जो अन्याय करेल मग तो कोणत्याही जातीचा असेना ते जालीमच आहे अल्लाह अशा लोकांना नस्तेनाबुत करेल व अमन,शांतता या भारता बरोबर जगात प्रस्थापित झाली पाहिजे या दृष्टि ने हा सामुहिक दुआ पठणचा कार्यक्रम घेण्यात आला.
No comments:
Post a Comment