साईनगर तांदूळवाडी रोड ते सातव चौकजवळ च्या रस्त्याची दयनीय अवस्था.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 18, 2023

साईनगर तांदूळवाडी रोड ते सातव चौकजवळ च्या रस्त्याची दयनीय अवस्था..

साईनगर तांदूळवाडी रोड ते सातव चौकजवळ च्या रस्त्याची दयनीय अवस्था..
बारामती:- बारामती शहरातील उपनगरामध्ये रस्त्याची बिकट अवस्था झाली असून याबाबत नुकताच अदिती पार्क सह. गृहनिर्माण संस्था मर्या.साईनगर, सातव चौक, तांदुळवाडी रोड, बारामती यांच्या वतीने बारामती नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांना रस्त्याचे डांबरीकरण करण्याबाबत लेखी निवेदन स्थानिक रहिवाशी व आदिती पार्क साईनगर तांदूळवाडी रोड सातव चौकजवळ बारामती यांनी दिले असून या ठिकाणी अतंर्गत रस्त्याची (साधारण 300 मी.) खुपच दयनीय अवस्था झालेली असून या भागात साधारण 60 कुटुंब आपला जीव मुटीत धरून या रस्त्याने ये जा करत आहेत. संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला असल्यामुळे गाड्या घसरून छोटे मोठे अपघात होतात लहान मुलांची अवस्था आणखी बिखट होत आहे. काही दिवसापूर्वी आमच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या MSEB मध्ये वायरमन असणारे श्री गणेश माने यांचा या रोडवर चिखलामूळे गाडी घसरून अपघात झाला. व त्याच्या गुडघ्याच्या तिन्हीही लिगामेन्ट निकामी झाले आहेत असे लहान मोठे अपघात वारंवार घडतात, आम्ही नगरपरिषदेचा कर न चुकता भरतो तरीही वारंवार मागणी करूनही आपल्या नगरपालिके मार्फत आम्हाला पक्का रस्ता मिळत नाही या प्रकरणी तात्काळ यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याचा निर्णय घ्यावा असे निवेदन अध्यक्ष - सु मेरा शेख,खजिनदार- शरद यादव  व स्थानिक रहिवाशी यांनी दिले.

No comments:

Post a Comment