सुशोभिकरणाच्या नावावर बारामती मध्ये उमलवली आहे कळी!..नागरिकांच्या सुरक्षेचा विसर पडल्या मुळे अजुन किती जाणार आहेत बळी..?
बारामती:- चौफेर बारामतीचा विकास उघड्या डोळ्याने पाहत असताना जर नेत्याची गर्वाने मान उंचावत असेल तर त्याच नेत्याच्या गावात जर अपुऱ्या सुरक्षा नियोजना मुळे नागरिकांचा नाहक बळी जात असेल तर मान शरमेने खाली झूकत नसेल का ?बारामती शहरामधून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्याचे सुशोभिकरणाच्या नावाखाली काँक्रीटीकरण केलें व ते करत असताना सूरक्षेच्या दृष्टीने शुन्य नियोजन केले गेले आहे..!
बारामती शहरात मागील काही वर्षांपूर्वी निरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण झाले, तेव्हापासून कालव्यात पडलेल्या व्यक्तींना स्वतः बाहेर पडणे अथवा इतरांकडून वाचविणे जिकिरीचे बनले आहे. कालवा अस्तरीकरणा नंतर अनेकांचा मृत्यू झाला आहे,त्याच बरोबर अस्तरीकरणा मुळे कालव्यात पडलेल्या व्यक्तीला स्वतःहून बाहेर पडणे अथवा इतरांनी मदत करून त्याला बाहेर काढणे हे अशक्य झाले आहे. कालवा अस्तरीकरणाचा हा तोटा सध्या दिसून येत आहे,
कालव्याच्या दोन्ही बाजू निमुळत्या आहेत. शिवाय तळाचा भागही सिमेंट काँक्रिटचा असल्याने,दोन्ही बाजूंना आधारासाठी कोणतीही व्यवस्था राहिलेले नाही. पूर्वी मातीचा भराव असताना कालव्यात अथवा बाजूलाही झाडे-झुडपे वाढली होती, त्याचा आधार बुडत्याला मिळत होता ती सोय आता उरलेली नाही. दुसरीकडे प्रवाहाची गती कमालीची वाढली आहे. त्यामुळे पट्टीच्या पोहणाऱ्यालाही कालव्याबाहेर येणे लवकर शक्य होत नाही परिणामी पाण्यात बुडून अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.
एकीकडे वरील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे उद्यानाला सुरक्षा जाळी बसवली जाते..
परंतु कालव्यात कोनी पडूनये जीवितहानी रोखण्यासाठी कालव्याला सुरक्षा जाळी का बसवली जात नाही?
काय नागरीकांचा जीव उद्यानातल्या खेळण्यान पेक्षा स्वस्त झाला आहे का?
त्यामुळें कालव्यात पडुन मृत्यू होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी बारामतीच्या नेत्यांनी लवकरात लवकर शहरी भागात वाहणाऱ्या कालव्याला सुरक्षा जाळी बसवान्याचे आदेश संबधित विभागाला द्यावे व लोकांचे प्राण वाचवावे आशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
बारामती सुशोभित करण्यासाठीं करोडो खर्च करण्यापेक्षा बारामती मधिल नागरीक कसे सुरक्षित राहतील यासाठी कॅनॉल वर दोन्हीं बाजूने जाळी बसवुन कामे मार्गी लावावीत, अन्यथा येणार्या काळात संभाजी ब्रिगेड बारामती व सुजान नागरीकांच्या वतीने संभाजी ब्रिगेड स्टाईलने संविधनिक मार्गाने आंदोलन येईल असे सांगण्यात आले.तर *बारामतीचा रंग रंगोटीचा विकास.! नागरीकांचा आनंदी संसार करत आहे भकास.!!*असे वक्तव्य शिवश्री असलम रज्जाक तांबोळी अध्यक्ष संभाजी ब्रिगेड बारामती शहर यांनी केले.
No comments:
Post a Comment