मोदी सरकार कायदा करण्याच्या तयारीत;ओळख अथवा विवाहित असल्याचे लपवून संबंध ठेवल्यास १० वर्षांची शिक्षा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 27, 2023

मोदी सरकार कायदा करण्याच्या तयारीत;ओळख अथवा विवाहित असल्याचे लपवून संबंध ठेवल्यास १० वर्षांची शिक्षा..

मोदी सरकार कायदा करण्याच्या
तयारीत;ओळख अथवा विवाहित असल्याचे लपवून संबंध ठेवल्यास १० वर्षांची शिक्षा..
 
नवीदिल्ली:-महिलांवर वाढते अत्याचार पाहता काही घटना खऱ्या तर काही आर्थिक लाभासाठी खोट्या केसेस करण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याचे दिसत आहे,अशातच मोदी सरकार कायदा करण्याचा तयारीत असल्याचे समजतंय, ओळख लपवून,धर्म लपवून अथवा लग्न लपवून
एखाद्या महिलेसोबत लग्न केल्याचे आणि नंतर तिचा छळ केल्याचे अनेक प्रकार सातत्याने घडत आहेत. आता विवाहित असल्याची माहिती
लपवून माहिती लपवून अथवा खरी ओळख लपवून एखाद्या महिलेसोबत लग्न करणे अथवा तिच्या सोबत संबंध प्रस्थापित करणे भारतीय
न्यायिक संहितेनुसार गुन्हा ठरणार आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ६९ नुसार असे करणे छळ मानले जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये १०
वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. मोदी सरकार तसा कायदा आणण्याच्या तयारीत आहे.यासाठी
कायदेविषयक संसदीय समितीने अहवाल तयार केला असून या संदर्भात विधेयक आणले
जाऊ शकते. अशा प्रकारचा कायदाअस्तित्वात आला तर, एखाद्या व्यक्तीने लग्न करण्यासाठी स्वतःची ओळख लपवली अथवा संबंध प्रस्थापित करण्यासाठी असे केले, तर तो बलात्कार मानला जाणार नाही, मात्र छळ मानला जाईल.यासाठी १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्याची तयारी सुरू आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रोजगार देणे,प्रमोशन अथवा लग्नाचे आश्वासन
देऊन ओळख लपवून लग्न करणे सुद्धा
छळ मानला जाईल, असे या सेक्शनमध्ये
स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय न्यायिक संहिता विधेयकावर स्थायी समितीचा मसुदा अहवाल सादर करण्यात येणार आहे. आता अशा प्रकरणात स्वतंत्रपणे खटला चालविला जाईल, असे पहिल्यांदाच होणार आहे.अशा प्रकरणांना कशा प्रकारे सामोरेजायचे, असा प्रश्नने हमीचपोलिसांसमोर येत असतो.आता हा कायदा झाल्यास, अशी प्रकरणे हाताळणे सोपे आहे.

No comments:

Post a Comment