RTO तपासणी अधिकारी मुडवर, तर ट्राफिक पोलीस यंत्रणा अँक्शन मोडवर... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 12, 2023

RTO तपासणी अधिकारी मुडवर, तर ट्राफिक पोलीस यंत्रणा अँक्शन मोडवर...

RTO तपासणी अधिकारी मुडवर, तर ट्राफिक पोलीस यंत्रणा अँक्शन मोडवर...
बारामती:-बारामती शहर तालुक्यासह व आसपासच्या भागात सतत घडणाऱ्या
अपघातांमुळे बारामती मधील वाहतूक
यंत्रणा तसेच अवैध डंपर, टिपर, ट्रकची
वाहतूक हाच चर्चेचा झाला  आहे.गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात शहरात अपघातांमुळे मृत्यू झाले आहेत तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेवर पत्रकार विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना, यांनी
आक्रमक आवाज उठवला आहे. याच
पार्श्वभूमीवर बारामती शहरात येणारे
अवजड वाहनांचे विशेष मोहीम राबवून पाटस रोड व फलटण रोड या ठिकाणी नाकाबंदी करून अवजड वाहतूक तसेच डंपर चालक यांचे
कागदपत्र, लायसन्स याची तपासणी केली गेली. तसेच डंपर वर असणारे अंधुक नंबर या संबंधीची दंडात्मक कारवाई केली व सदरचे नंबर दिसतील
अशा प्रकारे साफ करून घेतले घेतले.14 वाहनांवर कारवाई करून 16500 दंड करण्यात आला आहे. सदरची मोहीम यापुढे देखील सुरू ठेवत आहोत. असे बालाजी भांगे स.पो.नि.
जिल्हा वाहतूक शाखा, बारामती शहर यांनी सांगितले.मात्र खऱ्या अर्थाने ही कारवाई RTO विभागाने केली पाहिजे होती ती म्हणावी तशी होत नाही सतत घडत असलेल्या अपघातातुन दिसत आहे, ओव्हर लोड ट्रक, हायवा, कंटेनर अश्या गाड्या वर बारामतीत का कारवाई होत नाही असा प्रश्न सर्व सामान्य लोकांना पडला असला तरी विशेषतः राजकीय पुढाऱ्यांचीच जास्त गाड्या असल्याने व याकडे जाणुन बुजून लक्ष दिले जात नाही midc मध्ये सर्रास अशी वाहने पहावयास मिळत असली तरी कारवाई होत नाही. तसेच रस्त्याचे विकास कामे चालू आहे याठिकाणी देखील ओव्हर लोड वाहने सर्रास पाहवयास मिळत असून कारवाई होत नाही, यामुळे बेफामपणे वाहने चालवीत असल्याने अपघात घडत आहे हे मागील काही घटनांवरून दिसून येईल परंतु बारामती मध्ये धडक कारवाई केव्हा होणार कधी अँक्शन मुडवर येणार अशी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.

No comments:

Post a Comment