धक्कादायक..'तुम कहा जा रही हो,मे तूम्हे घर तक छोड देता हु' म्हणत 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार;दोघे अटक..!
पुणे:-हल्ली मुली व महिलांवर अत्याचार होत आहे,तर काही मुली घरातून रागाने निघून जात असल्याने त्याचा गैरफायदा नराधम घेत असतात नुकताच रेल्वे स्टेशन वर अश्या मुलींना हेरून त्यांच्यावर अत्याचार झाल्याची बातमी ताजी असतानाच एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घरातील कामावरुन आई रागवत असल्याने घरातून बाथरुमला बाहेर जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडलेल्या एका 14 वर्षाच्या मुलीवर एका तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला
आहे.याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.अभिषेक गणेश जगताप (वय-20) व निलेश नामदेव यादव ( 20, दोघे रा. मांजरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे.याप्रकरणी पीडित 14 वर्षीय मुलीने आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगी ही आठवी इयत्तेत शिकत असून ती घरी असताना, घरातील
कामावरुन आई सतत रागवत होती. त्यामुळे रागात ती घरातून बाहेर पडून पायी चालत जात होती. त्यावेळी आरोपी अभिषेक जगताप हा तिच्या पाठीमागून आला व त्याने 'तुम कहा जा रही हो, मेरा नाम अभिषेक है, मे तुम्हे घर तक छोड देता हु' असे म्हणाला. त्यानंतर त्याने त्याचा
साथीदार निलेश यादव याला फोन करुन बोलवले असता, तो बुलेट गाडीवर त्याठिकाणी आला. त्यानंतर सदर दोघांनी मुलीला जवळच एका पडक्या रुम मध्ये नेवून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. मुलीने त्यांना विरोध केला
असता, आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेले. याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस दाभाडे पुढील तपास करत आहे.याबाबत आवाहन करण्यात येत आहे की, मुलींनी रागावर नियंत्रण ठेवावे अनोळखी अथवा ओळखीच्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नये जेणे करून अत्याचाराला बळी पडू नये,कुटुंबातील व्यक्तींनी देखील खबरदारी घेतली पाहिजे.
No comments:
Post a Comment