धक्कादायक..नायब तहसीलदार 40 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात...
सांगली :-लाचखोरीचे प्रमाणात वाढ होत असताना महसूल विभाग व पोलीस खात्यात जास्त प्रमाणात लाच घेताना कारवाई झाल्याची प्रकरणे पुढे आली आहे, नुकताच धक्कादायक प्रकार समोर येत असताना नायब तहसीलदार लाच घेताना सापडला याबाबत मिळालेली माहिती अशी की,45 हजार रूपयाच्या
लाचेची मागणी करून 40 हजार रूपयाची
लाच घेतल्याप्रकरणी सांगली जिल्हयातील
केडगांव प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार सुनील जोतीराम चव्हाण (50) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील
तक्रारदार यांनी मंजुळा मलकांना कांबळे
यांना दीड गुंठे जमीन तर सीमा बाळू रायारू
यांना एक गुंठा जमीन विकली होती. सदरील
जमीनीस अकृषिक (एनए) आकारणी करून
सनद देण्याकरिता नायब तहसीलदार सुनील
जोतीराम चव्हाण यांनी दीड गुंठयासाठी 25
हजार रूपये तर एका गुंठयासाठी 20 हजार
रूपये अशी एकुण 45 हजार रूपयाच्या
लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती
40 हजार रूपयांवर मांडवली झाली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने
त्यांनी अॅन्टी करप्शनच्या कार्यालयात तक्रार
दाखल केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी
शुक्रवारी (दि. 17 नोव्हेंबर 2023) रोजी
करण्यात आली. दरम्यान, केडगांव येथील
प्रांत कार्यालयाच्या आवारात नायब
तहसीलदार सुनील जोतीराम चव्हाण याने
सरकारी पंचासमक्ष 40 हजार रूपयाची लाच
घेतली. त्यावेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात
आले. दरम्यान, सुनील जोतीराम चव्हाण हे यापुर्वी सन 2013 मध्ये अव्वल कारकून पदावर
इस्लामपूर प्रांत कार्यालयात कार्यरत होते.
त्यावेळी त्यांच्याविरूध्द 7 हजार रूपयाची
लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक
अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक विजय
चौधरी,उप अधीक्षक संदीप पाटील, पोलिस
निरीक्षक विनायक भिलारे, पोलिस निरीक्षक
दत्तात्रय पुजारी,पोलिस हवालदार ऋषिकेश बडणिकर,रामहरी वाघमोडे, पोलिस नाईक अजित पाटील, सुदर्शन पाटील,धनंजय खाडे, अतुल मोरे, सीमा माने,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पोपट पाटील यांच्या पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment