खळबळजनक..शारीरिक संबंधाबाबत घरच्यांना सांगण्याची धमकी देत वीस लाखांची महिलेने मागितली खंडणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 5, 2023

खळबळजनक..शारीरिक संबंधाबाबत घरच्यांना सांगण्याची धमकी देत वीस लाखांची महिलेने मागितली खंडणी..

खळबळजनक..शारीरिक संबंधाबाबत घरच्यांना
सांगण्याची धमकी देत वीस लाखांची महिलेने मागितली खंडणी..
 पुणे:- महिला अत्याचाराच्या घटना वाढतायेत हे पाहत आलो असलो तरी,काही अंशी महिला देखील खोट्या तक्रारी करून आर्थिक लाभ घेण्यासाठी नंतर तडजोडी करण्याचे सद्या प्रकार वाढत चाललेत कुणी प्लॅट तर कुणी पैसा दागिने मागतात आधी संगनमताने शारीरिक संबंध ठेवायचे नंतर त्याचे व्हिडिओ किंवा काही पुरावे तयार करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तडजोड करीत लाखोंची माया गोळा करायची असे अनेक प्रकार उघडकीस येत असताना एक खळबळजनक घटना समोर आली मिळालेल्या माहितीनुसार  शारीरिक संबंधाची माहिती घरच्यांना सांगण्याची धमकी देत, तसेच गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन युवकाकडे वीस लाख रुपये खंडणी  मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 ते 28 ऑक्टोबर 2023 दरम्यान हडपसरमध्ये घडला आहे. याबाबत लोहगाव येथे राहणाऱ्या 35 वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार हडपसर येथील महिलेवर आयपीसी 384, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी महिलेची ओळख झाल्यानंतर त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर महिलेने फिर्यादी यांना वारंवार फोन करुन भेटण्यासाठी
बोलावून घेतले. फिर्यादी भेटण्यास गेले नाही तर त्यांना शारीरिक संबंधाची माहिती घरच्यांना
देणार असल्याची धमकी दिली.तसेच गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वारंवार पैसे घेतले.तसेच हे प्रकरण मिटवायचे असेल तर एक रक्कमी 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.पैसे दिले नाही तर कायदेशीर कारवाई करेन असे सांगून नोकरी घालविण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस  करीत आहे.

No comments:

Post a Comment