अखेर मनोज जरांगे यांचे उपोषण मागे; घेतला मोठा निर्णय..
जालना:-मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या, अशी मागणी करीत वेळ घ्या पण आरक्षण द्या,अशी घोषणा करत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी (दि. २) उपोषण सोडण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, जरांगे पाटलांनी सरकारला २ जानेवारीपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी
येथे उपोषणास बसले होते. दरम्यान, सरकारचे
शिष्टमंडळ आज (दि. २) जरांगे-पाटील यांची भेट
घेण्यासाठी जालन्याला गेले होते. यानंतर
उपोषणाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना केली. सरकारला वेळ कशासाठी हवा आहे, ते समोर येऊन सांगा. आरक्षण कसे द्यायचे, कधी देणार ते आम्हाला कळू द्या. त्यावर समाजाशी बोलून आम्ही वेळ द्यायचा की नाही ते ठरवू; पण वेळ मारून नेऊ नका. तुम्हाला
गरज असेल तर चर्चेला या, नसेल तर तिकडेच
विमानात झोपा, अशा शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सरकारला सुनावले होते. सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पाणीही घेणार नसल्याचा निर्णय बुधवारी संध्याकाळी जाहीर केला होता. मात्र, सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी गुरुवारी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. यानंतर सरकारला २ जानेवारी पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment