धक्कादायक..लहान भाऊ छेड काढत असल्याची तक्रार करण्यासाठी मोठ्या भावाकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 29, 2023

धक्कादायक..लहान भाऊ छेड काढत असल्याची तक्रार करण्यासाठी मोठ्या भावाकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार..

धक्कादायक..लहान भाऊ छेड काढत असल्याची तक्रार करण्यासाठी मोठ्या भावाकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार..
पुणे:-महिलांवरील  अत्याचार वाढतच चालल्या असून तक्रारी करणे गुन्हा होत आहे की काय अनेक अश्या घटना आहेत की तक्रारी करू नये म्हणून पुन्हा अत्याचार होत आहे नुकतीच पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अत्याचार व गुन्ह्याच्या घटनेत वाढ होत
असल्याचे दिसत आहे. अलीकडेच आणखी एक संतापजनक घटना घडली आहे.पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक
धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून   प्रकार घडला आहे. लहान भाऊ छेड काढत
असल्याची तक्रार करण्यासाठी मोठ्या भावाकडे गेलेल्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला आहे. अलंकार पोलीस ठाण्यात या प्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार
किशोर परमेश्वर केदार आणि नकुल परमेश्वर केदार या दोघा सख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोथरूड येथील वस्ती जवळ हा संपूर्ण प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी
अल्पवयीन आहे. ती क्लासला येत जात असताना आरोपी नकुल केदार याने तिची छेड काढली होती. याची तक्रार पिडितिने आरोपीचा मोठा भाऊ किशोर केदार यांच्याकडे केली होती. तक्रार करत असतानाच आरोपी किशोर केदार
यांनी फिर्यादी तरुणीला जबरदस्तीने ओढून नेऊन माझ्या भावाची तक्रार करते काय असे म्हणून तिच्यावर बलात्कार केला. तसेच मी ज्यावेळेस बोलवेल त्यावेळेस यायचे नाही आलीस तर तुझे काय करायचे ते बघतो असे म्हणून धमकी
दिली आहे.आरोपीने दिलेल्या धमकीमुळं पीडित मुलगी खूपच घाबरली होती. तिच्या पालकांनी खोदून विचारल्यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिस
ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अलंकार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment