धक्कादायक..लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार,भावाला अश्लील व्हिडिओ पाठवत दिली जीवे मारण्याची धमकी..
पुणे:-महिला अत्याचाराच्या घटना त्यातच व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी असले प्रकार सद्या वाढतच चालले असून त्याच्या तक्रारी देखील होत आहेत नुकताच दाखल झालेल्या गुन्ह्याच्या माहितीनुसार लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ तरुणीच्या भावाला पाठवून जीवे मारण्याची
धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार
समोर आला आहे. याप्रकरणी सोलापूर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2015 ते 2019 या कालावधीत बालेवाडी आणि सासवड येथे घडला आहे.याबबत पीडित महिलेने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.20)फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रीकांत लिंबाजी राठोड (रा. दोडतांडा,जिल्हा-सोलापूर) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन,
354क, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. तुझ्या सोबत बोलायचे आहे असे सांगून आरोपीने पीडित तरुणीला घरी बोलावून घेतले.त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बालेवाडी आणि सासवड येथील भिवरी येथे नेऊन शरीर संबंध ठेवले. आरोपीने तरुणीसोबत शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडिओ काढले.
हे व्हिडिओ त्याने पिडित तरुणीला व तिच्या भावांना पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment