बारामती बंदचा इशारा?धनगर आंदोलनाची वाढतेय तीव्रता.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 15, 2023

बारामती बंदचा इशारा?धनगर आंदोलनाची वाढतेय तीव्रता..


बारामती बंदचा इशारा?धनगर आंदोलनाची वाढतेय तीव्रता..
बारामती:- बारामतीत गेली सात दिवसापासून धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांना पाठिंबा देण्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत असून गावातून रॅली काढून पाठिंबा देण्यात आला प्रशासन भवन, बारामती समोर चालू असलेल्या उपोषणाला धनगर आरक्षणासाठी प्रशासकीय भवन बारामती येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला महिलांचा भाऊबीज करुन पाठिंबा देण्यात आला,उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांना ओवाळून केली आरोग्याची प्रार्थना...यावेळी कल्याणी वाघमोडे, पत्नी अश्विनी वाघमोडे, साक्षी बंडगर, शोभा माने, कांचन धायगुडे, अलका माने, पुनम सुळ, अक्षदा मलगुंडे आदी महिलां भगिनींनी उपस्थित राहून सुरुवातीला भाऊबीज निमित्त ओवाळणी करुन पाठिंबा दिला. चंद्रकांत वाघमोडे यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.तर यावेळी महिला भगिनींनी आपल्या पाठिंबा भाषणात बोलताना या उपोषण कर्त्याची दखल तात्काळ न घेतल्यास उद्या दि.16/11/2023 ला बारामती बंद करण्याचा इशारा देण्यात आला.

No comments:

Post a Comment